Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सरकारी कमिटीला सरकारच्याच आदेशाचा विसर !  पूररेषेच्या सर्व्हेक्षणाची मुदत उलटूनही समितीची ना बैठक…ना पाहणी, अहवाल तर लांबच ! !सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामकाजामुळे हजारो सभासद मतदानापासून वंचित, चित्रपट महामंडळात परिवर्तन गरजेचे पी. सावळाराम यांच्या भावगीतातील सौंदर्य जनसामान्यांना आपलेसे करणारे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी रवींद्र माणगावे, उपाध्यक्षपदी संजय शेटे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन ! रंगबहारर संस्थेसह चित्रपट व्यावसायिकही उपस्थित कोरे अभियांत्रिकीमध्ये पीबीएल दिन उत्साहातमहिला - बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवा,  दीपा ठाणेकरांची सहपालकमंत्र्यांच्याकडे मागणीसिनेमा प्रदर्शनासाठी राज्यभरात ५०० मिनी थिएटर, कामगारांना पंचवीस टक्के वेतनवाढ, निर्मात्यांसाठी स्वतंत्र वितरण व्यवस्थायुवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते सुवर्णालंकारित तोरणाचे पूजन डॉ. शिवाजीराव कदम यांच्याकडून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगला 25 लाखाची देणगी

जाहिरात

 

सिनेमा प्रदर्शनासाठी राज्यभरात ५०० मिनी थिएटर, कामगारांना पंचवीस टक्के वेतनवाढ, निर्मात्यांसाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था

schedule03 Jun 26 person by visibility 91 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठी सिनेमाच्या प्रदर्शनासाठी राज्यभरात ५०० मिनी थिएटर उभारणीचा प्रस्ताव आहे. बसस्थानक परिसरात ही थिएटर्स असतील. याशिवाय चित्रपट कामगारांच्या वेतनात किमान पंचवीस टक्के वाढ करण्यात येईल अशी ग्वाही समर्थ आघाडीचे प्रमुख मेघराज राजेभोसले व सुशांत शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच निर्मात्यांसाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था केली जाईल. सभासदांचा अपघात व आरोग्य विमा उतरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी सात जून २०२६ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारार्थ समर्थ पॅनेलच्या वतीने मंगळवारी, कोल्हापुरात सभासदांचा मेळावा झाला. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना राजेभोसले यांनी, समर्थ पॅनेलचा जाहीरनामा मांडला. ते म्हणाले, ‘चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष म्हणून गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत सभासदांसाठी विविध योजना  राबविल्या. कोल्हापुरात अद्ययावत चित्रनगरी असावी यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला. कोरोना काळात मदत मिळवून दिली.जवळपास आठ कोटी रुपये किंमतीच्या महामंडळाच्य मालकीच्या इमारती केल्या.महामंडळाच्या ठेवीत वाढ झाली. कामांचे विकेंद्रीकरण करताना महामंडळांच्या शाखांचा विस्तार

  धनाजी यमकर यांनी, महामंडळाच्या माध्यमातून सभासदासाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. संजय ठुबे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. महामंडळाचा कारभार अतिशय चोखपणे केला आहे. महामंडळावर प्रशासक नियुक्ती झाली नाही. मात्र विरोधक सभासदांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी खोटेनाटे आरोप करु नयेत. रवी गावडे यांनी विरोधी आघाडीतील उमेदवार रणजीत जाधव यांनी कामगार वर्गातून निवडणूक लढवित कामगारांवर अन्याय केला आहे. ते यापूर्वी निर्मिती व्यवस्थापक गटातून निवडणूक लढविले आहेत. यंदा त्यांनी, मयत सभासद कामगाराचा कार्ड वापरुन कामगार गटातून निवडणूक लढवित आहेत.मात्र ते सभासदांना रुचणार नाही.असे सांगितले.

चौघांचाच विरोध, बहुसंख्य सभासद आमच्या बाजूने

विरोधी आघाडीतील मिलिंद अष्टेकर, रणजीत जाधव, आनंद काळे व बाबा लाड असे चौघे जणच आमच्या कारभाराविषयी सभासदांमध्ये गैरसमज पसरवित आहेत. याउलट बहुसंख्य सभासद मतदार आमच्या बाजूने आहेत. महामंडळाचा कारभार चोखपणे सुरू असताना या मंडळींनी पत्रकबाजी केली, तक्रारी केल्या. यातून त्यांनी काय साध्य केले ? अष्टेकर व काळे यांनी, व्यक्तिकेंद्रीत काम करत स्वत:चा फायदा करुन घेतला. अशी मंडळी सभासदांचे हित काय साधणार असा सवाल समर्थ पॅनेलच्या उमेदवारांनी केला.

पत्रकार परिषदेला उमेदवार शरद चव्हाण, राज काझी, दीपक कदम, प्रवीण पाटील, विकास तोरणे, आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes