Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सरकारी कमिटीला सरकारच्याच आदेशाचा विसर !  पूररेषेच्या सर्व्हेक्षणाची मुदत उलटूनही समितीची ना बैठक…ना पाहणी, अहवाल तर लांबच ! !सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामकाजामुळे हजारो सभासद मतदानापासून वंचित, चित्रपट महामंडळात परिवर्तन गरजेचे पी. सावळाराम यांच्या भावगीतातील सौंदर्य जनसामान्यांना आपलेसे करणारे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी रवींद्र माणगावे, उपाध्यक्षपदी संजय शेटे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन ! रंगबहारर संस्थेसह चित्रपट व्यावसायिकही उपस्थित कोरे अभियांत्रिकीमध्ये पीबीएल दिन उत्साहातमहिला - बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवा,  दीपा ठाणेकरांची सहपालकमंत्र्यांच्याकडे मागणीसिनेमा प्रदर्शनासाठी राज्यभरात ५०० मिनी थिएटर, कामगारांना पंचवीस टक्के वेतनवाढ, निर्मात्यांसाठी स्वतंत्र वितरण व्यवस्थायुवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते सुवर्णालंकारित तोरणाचे पूजन डॉ. शिवाजीराव कदम यांच्याकडून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगला 25 लाखाची देणगी

जाहिरात

 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी रवींद्र माणगावे, उपाध्यक्षपदी संजय शेटे

schedule03 Jun 26 person by visibility 394 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्याच्या व्यापार, उद्योग, व्यवसाय व  कृषी क्षेत्राची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबईच्या अध्यक्षपदी सांगलीचे प्रसिध्द उद्योजक रवींद्र परिसा माणगावे व प श्चिम महाराष्ट्र विभागातून कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय धनपाल शेटे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तसेच गव्हर्निंग कौन्सील सदस्यपदी आमदार राजेंद्र शामराव पाटील- यड्रावकर यांच्यासह कोल्हापूर चेंबरचे माजी अध्यक्ष आनंद शंकरराव माने, राजू तुकाराम पाटील, प्रशांत शशीकांत शिंदे, अजित सोहनलाल कोठारी, धनंजय सुरेश दुग्गे, संजय कुमार पाटील, धैर्यशील हिंदुराव पाटील, गोरख शंकर माळी, नंदकुमार रमणलाल शहा यांची बिनविरोध निवड झाल्याचे *मुख्य निवडणूक अधिकारी सुरेश घोरपडे* यांनी जाहीर केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई ही संघटना पुढील वर्षी शताब्दी वर्ष साजरे करत असून या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील व्यापार-उद्योगाचे प्रश्न सोडविले जातात. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून ‘गाव तेथे उद्योजक’ या उपक्रमासह शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सांगितले. तर राज्य स्तरासह स्थानिक पातळीवरील व्यापारी-उद्योजकांचे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावणेसाठी उपाध्यक्ष या नात्याने कटीबध्द असल्याची ग्वाही संजय शेटे यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes