Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन कलापर्व जल्लोषातजिल्हयातील १८ ग्रामपंचायतींना एक लाखाचे प्रोत्साहनपर बक्षीसनारळीकर विज्ञान कथा स्पर्धेत डॉ. सुनील विभूते, दीपक कुंभार, डॉ.प्रशांत पुंडे विजेतेआलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कारभिशीचे रुपांतर पतसंस्थेत…आता शंभर कोटीच्या ठेवीकडे वाटचालचार्टर्ड अकौंटंट्स  कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी सीए आशिष सेवेकरी, उपाध्यक्षपदी अलोक शहा कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड सतरा मार्चला ! पंचायत समिती सभापती दहा मार्चला निवडणार!!शिक्षण घेणं म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान मिळवणं नव्हे तर माणूस म्हणून जगणे महत्त्वाचे - कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहातकृष्णराज महाडिकांचे  रविवारी कोल्हापुरात होणार  जल्लोषी स्वागत

जाहिरात

 

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन कलापर्व जल्लोषात

schedule28 Feb 26 person by visibility 51 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी च्या वार्षिक स्नेहसंमेलन कलापर्व जल्लोषात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, एकल गीत, भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय जबाबदारी, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडविणाऱ्या विषयावर सुंदर सांस्कृतिक सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे हे होते. लोकमत समूहाचे उपाध्यक्ष मकरंद देशमुख हे प्रमुख पाहुणे होते. संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, संचालिका सविता पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  महाविद्यालयातील प्राध्यापकांना विशेष योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच २०२६चे जनरल चॅम्पियन्स ट्रॉफी द्वितीय वर्ष बी. फार्मसी व द्वितीय वर्ष डी. फार्मसी यांनी पटकावली.

कार्यक्रमास संस्थेचे व्हाइस चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजानिस वाय.एस. चव्हाण, संचालक.पी.सी पाटील, सी आर गोडसे, विकास अधिकारी डॉ. संजय दाभोळे, न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्या ए. एस.  पुजारी उपस्थित होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र  कुंभार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. योगेश पुजारी व  पूजश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रियांका गायकवाड यांनी आभार मानले.  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. भक्ती वाली, प्रा. अंजली महाडिक,प्रा. प्रज्ञा घरपणकर, प्रा. रोहिणी ताटे, प्रा. योगेश कोळेकर यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes