जिल्हयातील १८ ग्रामपंचायतींना एक लाखाचे प्रोत्साहनपर बक्षीस
schedule28 Feb 26 person by visibility 108 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात आलेल्या सुपोषित ग्रामपंचायत अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याने उत्तेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींची उत्कृष्ट कार्याबद्दल निवड झाली असून राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी ग्रामपंचायतींना केंद्र सरकारमार्फत प्रत्येकी १ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस आणि विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के यांनी दिली.
पुरस्कारास पात्र ठरलेल्या १८ ग्रामपंचायतीमध्ये आजरा तालुक्यातील कासारकांडगाव, साळगांव, कोवाडेचा समावेश आहे. भुदरगड तालुक्यातील मुदाळ, व्हनगुत्त तर गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे, उंबरवाडीचा समावेश आहे. गगनबावडा तालुक्यातील कोदे, अणदुर, साखरी म्हांळुगे, कागलमधील पिंपळगाव खुर्द, करवीरमधील हलसवडे, पाडळी बुद्रुकचा समावेश आहे. पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ आळते, कसबा बोरगांव, काळजवडे तर राधानगरीतील घोटवडे, नरतवडे या गावांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. व जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली याकामी शिरोळच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी मनिषा पालेकर आणि जिल्हा कक्षाचे विस्तार अधिकारीसौरव कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.