नारळीकर विज्ञान कथा स्पर्धेत डॉ. सुनील विभूते, दीपक कुंभार, डॉ.प्रशांत पुंडे विजेते
schedule28 Feb 26 person by visibility 126 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : अक्षर दालन आणि निर्धार प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजितज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर राज्यस्तरीय मराठी विज्ञान कथा स्पर्धा निकाल राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शनिवारी जाहीर करण्यात आला. ‘अक्षर दालन’चे अमेय जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी पत्रकाव्दारे ही माहिती दिली.
डॉ. जयंत नारळीकर हे मुळचे कोल्हापूर. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही गतवर्षी ही स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि राज्याबाहेरून ५४ कथा या स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या होत्या. या कथांचे परीक्षण करून खालीलप्रमाणे निकाल जाहीर करण्यात आला आहे. डॉ. नारळीकर यांच्या स्मृतीदिनी २० मे रोजी या पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. डॉ. सुनील विभुते यांना प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, सन्मानपत्र जाहीर झाले. दीपक भाऊ कुंभार यांना द्वितीय पारितोषिक ४ हजार रुपये, सन्मानपत्र तर
डॉ. प्रशांत अशोक पुंड यांना तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये, सन्मानपत्र जाहीर झाले.उत्तेजनार्थ पारितोषिक २ हजार रुपये, सन्मानपत्र हे डॉ. मोनाली हर्षे , पुणे उत्तेजनार्थ पारितोषिक १ हजार रुपये, सन्मानपत्र हे डॉ.अविनाश भोंडवे, न्यानसी दावणे व प्रज्ञा जांभेकर मुंबई यांना जाहीर झाला.