आदिवासी एम्पलॉइज फेडरेशनतर्फे रविवारी आदिवासी दिनाचे आयोजन
schedule09 Aug 25 person by visibility 72 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉइज फेडरेशन कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने रविवारी (१० ऑगस्ट २०२५) आदिवासी दिन साजरा करण्यात येणार आहे. फुलेवाडी येथील जिल्हा परिषद सोसायटी सभागृह फुलेवाडी येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राजेंद्र गाडेकर, रवींद्र ठोकळ, शिवाजी गवळी, संजय वळवी हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. आदिवासी चळवळीतील कार्यकर्ते डॉ. जालिंदर घिगे (अहिल्यानगर) प्रमुख वक्ते म्हणून लाभणार आहेत. आदिवासी समाज संस्कृती, चालीरीती,परंपरा व समाजापुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत असे संयोजकांनी कळविले आहे.