आंदोलनातील शिक्षक -कर्मचाऱ्यांचे दोन दिवस विनावेतन होणार
schedule18 Jul 25 person by visibility 130 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : वाढीव टप्पा अनुदानासाठी आठ व नऊ जुलै 2025 रोजी राज्यातील शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. दरम्यान या आंदोलनात सहभागी शाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. आंदोलनाच्या दोन दिवसाच्या कालावधीत ज्या शाळा पद्धती आहेत त्यांची माहिती वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने मागविले आहे. या दोन दिवसाच्या कालावधीत जे शिक्षक अनुपस्थित आणि आंदोलनात सहभागी होते तसेच ज्या शाळा बंद होत्या तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतने विनावेतन करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने 21 जुलै पर्यंत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक प्राचार्यांनी माहिती सादर करावी अशा सूचना शिक्षण विभागाने दिले आहेत.
आठ व नऊ जुलै रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले होते या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील 1300 हून अधिक शाळा सहभागी झाला आहे. प्राथमिक, माध्यमिक ,अनुदानित, खाजगी अनुदानित अशा सर्वच शाळांचा सहभाग होता. दोन दिवस शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता माध्यमिक शिक्षण विभाग आता आंदोलनाच्या कालावधीत बंद असलेल्या शाळा व त्यादरम्यान शाळेमध्ये अनुपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे. या संदर्भात सर्व शाळांना परिपत्रक काढले आहे. 21 जुलै 2025 पर्यंत माहिती सादर करण्याच्या सक्त सूचना आहेत.