Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पर्यावरणदिनी क्रिडाई संघटनतर्फे शंभर रोपांची लागवडजिल्हा परिषदेत स्वराज्यगुढी, शिवराज्याभिषेकदिनी शिवरायांच्या कर्तुत्वाला उजाळामहापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदलीचा कार्यक्रम जाहीरगोकुळमध्ये शिवराज्याभिषेकदिन साजराकोल्हापुरात सोमवारी -मंगळवारी पाणी पुरवठा बंदमहावितरणच्या वीज प्रश्नांवर पालकमंत्र्यांचा सोमवारी ऊर्जा दरबारशारंगधर देशमुखांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट ! मेळावा घेऊन कोल्हापुरात होणार पक्षप्रवेश राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या पुण्यातील कार्यक्रमाला कोल्हापुरातून 5000 कार्यकर्ते जाणारचित्रकाराची शिवभक्ती, चित्रातून उलगडला शिवछत्रपतींचा इतिहास !जोतिबा मंदिर विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सरकार पाठीशी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

कोल्हापुरात सोमवारी -मंगळवारी पाणी पुरवठा बंद

schedule06 Jun 25 person by visibility 62 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणारे थेट पाईपलाईन योजनेतील काळम्मावाडी पंपिंग स्टेशनचे मान्सूनपुर्व देखभाल दुरुस्तीचे काम  ९ व १० जून २०२५ रोजी करण्यात येणार आहे. यामुळे या योजनेवरील अवलंबून असणा-या संपूर्ण कोल्हापूर शहर व सलग्नीत उपनगरे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सोमवारी व मंगळवारी पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. बुधवारपासून पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. तसेच बालिंगा योजनेवर अवलंबून असणा-या सी व डी वॉर्डमधील नागरीकांचा पाणी पुरवठा सुरू राहील.

ए,बी वॉर्डातील पुईखडी परिसर, कलिकते नगर , सुलोचना पार्क परिसर , इंगवले कॉलनी परिसर, नाना पाटील नगर, जिवबा नाना परिसर, बापूरामनगर परिसर , साळोखेनगर परिसर, राजीव गांधी वसाहत, कात्याणी कॉम्ल्पलेस, तपोवन परिसर, देवकर पाणंद परिसर, मोरे माने नगर परिसर,संभाजीनगर स्टँड परिसर, नाळे कॉलनी, रामानंद नगर, बालाजी पार्क, शाहू कॉलनी परिसर, सासणे कॉलनी, रायगड कॉलनी परिसर, जरगनगर, सुभाषनगर, शेंडापार्क परिसर, आर.के.नगर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी परिसर तसेच संभाजीनगर परिसर, गंजीमाळ परिसर,संपुर्ण शिवाजी पेठ परिसर, राजकपूर पुतळा परिसर, संपुर्ण मंगळवार पेठ परिसर, पोतणीस बोळ परिसर, मंगेशकर नगर, बेलबाग परिसर, महालक्ष्मीनगर, सरनाईक वसाहत, त्रिकोणे गॅरेज परिसर, नेहरूनगर, वाय.पी.पोवार नगर, जवाहर नगर.

            ई वॉड संपूर्ण राजारामपुरी परिसर, शाहू मिल परिसर, शाहुमिल कॉलनी परिसर, वैभव हौसिंग सोसायटी परिसर, ग्रीनपार्क परिसर, शांतीनिकेतन परिसर, रेव्हेन्यु कॉलनी परिसर, अरूणोदय परिसर, राजेंद्रनगर परिसर, चौगुले हायस्कुल परिसर, सम्राट नगर परिसर, प्रतिभानगर परिसर, इंगळेनगर परिसर, दौलतनगर परिसर उद्यमनगर परिसर, शास्त्रीनगर परिसर, पांजरपोळ परिसर,  नवश्या मारूती चौक परिसर, दत्तगल्ली परिसर, यादवनगर परिसर, कामगार चाळ, पंत मंदीर परिसर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर परिसर, पायमल वसाहत परिसर, अंबाई डीफेन्स परिसर, राजाराम रायफल, काटकर माळ.

            कावळानाका संपुर्ण ई वॉर्डातील बावडा फिल्टर हाऊसवर अवलंबून असणारा संपूर्ण कसबा बावडा परिसर, लाईन बाजार, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, महाडीक वसाहत, रूईकर कॉलनी परिसर, लिशा हॉटेल परिसर, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, शिवाजीपार्क, फ्रेंड्स कॉलनी, ताराबाई पार्क, नागाळापार्क, रमणमळा, शालीनी पॅलेस परिसर, मुक्त सैनिक वसाहत परिसर, मार्केटर यार्ड परिसर, सी.बी.एस. स्टेशन रोड परिसर, साईक्स एक्सटेंशन परिसर, न्यु शाहुपूरी, खानविलकर पेट्रोलपंप परिसर, शाहुपूरी व्यापारपेठ, व्हीनस कॉर्नर, शाहुपूरी एक ते चौथी गल्ली, बी.टी.कॉलेज परिसर, बापट कँप परिसर, संपुर्ण टेंबलाई वाडी परिसर, पाच बंगला परिसर इत्यादी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes