महापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदलीचा कार्यक्रम जाहीर
schedule06 Jun 25 person by visibility 1181 categoryशैक्षणिकमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्राथमिक शिक्षण समितीमार्फत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी कोल्हापूर महापालिकेच्या शाळांकडील बदली पात्र मुख्याध्यापक, विषय शिक्षक व सहायक शिक्षक कर्मचाऱ्यांचा बदली समुपदेशनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शिक्षक सर्वसाधारण बदली प्रक्रिया समुपदेशन पद्धतींने होणार आहे. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे. मंगळवारी, दहा जून २०२५ रोजी वि. स. खांडेकर विद्यामंदिर येथे सकाळी ९.३० वाजता बदली प्रक्रियेला प्रारंभ होईल.समुपदेशन बदली प्रक्रियेतंर्गत प्रत्येक घटकासाठी वेळ निश्चित केली आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या बदलीसाठी सकाळी ९.३० वाजता समुपदेशन प्रक्रिया होणार आहे. मुख्याध्यापक वेतन घेणारे शिक्षकांच्या बदली प्रक्रिया समुपदेशनची वेळ सकाळी दहा वाजता आहे. सहायक शिक्षकांनी १०.३० वाजता तर पदवीधर -विषय शिक्षकासाठी (गणित -विज्ञान) दुपारी १.३० वाजता तर पदवीधर –विषय शिक्षकांसाठी (भाषा) दुपारी दोन वाजता समुपदेशन होणार आहे. ऊर्दू माध्यम शाळेतील मुख्याध्यापकांच्या समुपदेशनाची वेळ दुपारी २.३० वाजता तर सहायक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया त्यानंतर सुरू होईल.अशी माहित प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी दिली आहे.