Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या विकासाचा बनणार ॲक्शन प्लॅन : मंत्री, आमदारांच्या उपस्थितीमध्ये २८ विषयावर चर्चादूध संस्थांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करा, संस्था प्रतिनिधी धडकले सहायक निबंधक कार्यालयावर जिल्हा परिषदेत बिल मंजुरीतील टेबल कमी होणार, बांधकाम विभागाचा निर्णय : सभापती सारिका नांदेकरजिल्हा परिषदेचे पदाधिकारी घेणार तालुकास्तरीय आढावा बैठक, जनता दरबार भरवणार दिवाळीनंतर नागपूर, गोवा, दिल्ली, राजस्थान अन् गुजरातसाठी विमानसेवा - धनंजय महाडिकशाहूवाडीच्या एमआयडीतील गुंतवणुकीसाठी आमदार विनय कोरेंनी घातली कोल्हापुरातील उद्योजकांना सादडीवाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या ! राज्यात तिसऱ्या स्थानी,नवी दिल्लीत सन्मान !!कृष्णराज महाडिक यांच्या युवाशक्ती जागर यात्रेचे सिंधुदुर्गमध्ये जल्लोषी स्वागतन्यू कॉलेजची विद्यार्थिनी श्रेया गुरवला तीस हजाराची शिष्यवृत्तीन्याय- बंधुता - समता या त्रिसूत्रीवर काम करणार - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत बिल मंजुरीतील टेबल कमी होणार, बांधकाम विभागाचा निर्णय : सभापती सारिका नांदेकर

schedule27 Apr 26 person by visibility 127 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :सरकारी खात्याची बिल मंजुरीची प्रक्रिया म्हणजे टेबल पे टेबलफायलीचा प्रवास संपता संपत नाहीया पद्धतीला जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागही अपवाद नाही. जिपतील बांधकाम विभागामार्फत विविध विकासकामे होतात. कंत्राटदारांमार्फत ही कामे करुन घेतली जातात. विकासकामांचे अंदाजपत्रकय व शेड्यूल बी प्रमाणे बिल तयार करुन ते कंत्राटदारांच्या खात्यावर जमा होण्यासाठी ३२ टेबलवरुन फाइल फिरत असतो. यामुळे काही वेळेला विलंब होतो. हा विलंब करण्यासाठी सध्याच्या ३२ टेबलच्या मंजुरीच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. बिल मंजुरीच्या प्रक्रियेतील ३२ मधील ११ टेबल कमी केले आहेत. यामुळे आता कंत्रादारांना आता बिलसाठी जास्त दिवसाची प्रतिक्षा करावी लागणार नाही.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या सभापती सारिका नांदेकर यांनी याकामी पुढाकार घेऊन बिल मंजुरीचा कालावधी कमी केला आहे. या नव्या प्रक्रियेनुसार आता बिले निघणार आहेत. या संदर्भातील माहिती त्यांनी सोमवारी, २७ एप्रिल २०२६ रोजी दिली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या पाटील, समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बांधकाम समिती सभापती नांदेकर यांनी,बिल मंजुरीच्या सध्याच्या प्रचलित पद्धतीत केलेल्या बदलाची माहिती दिली. या नव्या प्रक्रियेला मुख्य कार्यकारी अधिकारी जस्मिन यांनी मान्यता दिली आहे.

 जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागामार्फत करण्यात येणारी विकासकामे कंत्राटदारांकडून होतात. जिल्हा परिषदेच्या सगळया योजना या ग्रामीण भागाशी निगडीत. यामुळे बिल मंजुरीची प्रक्रिया पंचायत समितीपासून सुरू होते. अंदाजपत्रक व शेड्यूलप्रमाणे बिल तयार करुन ई एमबी केली जाते. त्यानंतर वरिष्ठ लिपिकाकडे संबंधित फाईल फॉरवर्ड होते. पंचायत समितीतून जिल्हा परिषदेत बिल फॉरवर्ड झाल्यानंतर प्रकल्प अधिकारी, ऑडिटर, सहायक लेखा अधिकारी, कार्यकारी अभियंता, ऑडिटर,  वित्त विभागातील अधिकारी, पुन्हा बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची शिफारस होऊन अंतिमता वित्त विभागाकडे जाते.अशा एकूण ३२ टेबल आहेत. यातील ११ टेबलवरील फाईलचा प्रवास आता थांबणार आहे.’असे नांदेकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेवेळी मुख्य वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील, आरोग्य अधिकारी अनिरु्द्ध पिंपळे उपस्थित होते.

………………..

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधेवर लक्ष

सभापती नांदेकर यांनी बांधकाम व आरोग्य खात्याचा कारभार हाती घेतल्यापासून तालुकानिहाय दौरे सुरू केले आहेत. आतापर्यत पाच तालुक्यांचा दौरा केला आहे. या दौऱ्यात त्या, प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत आहेत. तिथल्या सुविधांची तपासणी करतात. नागरिकांशी संवाद साधतात. आरोग्य विषयक सेवासुविध उपलब्ध करुन देण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes