Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या विकासाचा बनणार ॲक्शन प्लॅन : मंत्री, आमदारांच्या उपस्थितीमध्ये २८ विषयावर चर्चादूध संस्थांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करा, संस्था प्रतिनिधी धडकले सहायक निबंधक कार्यालयावर जिल्हा परिषदेत बिल मंजुरीतील टेबल कमी होणार, बांधकाम विभागाचा निर्णय : सभापती सारिका नांदेकरजिल्हा परिषदेचे पदाधिकारी घेणार तालुकास्तरीय आढावा बैठक, जनता दरबार भरवणार दिवाळीनंतर नागपूर, गोवा, दिल्ली, राजस्थान अन् गुजरातसाठी विमानसेवा - धनंजय महाडिकशाहूवाडीच्या एमआयडीतील गुंतवणुकीसाठी आमदार विनय कोरेंनी घातली कोल्हापुरातील उद्योजकांना सादडीवाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या ! राज्यात तिसऱ्या स्थानी,नवी दिल्लीत सन्मान !!कृष्णराज महाडिक यांच्या युवाशक्ती जागर यात्रेचे सिंधुदुर्गमध्ये जल्लोषी स्वागतन्यू कॉलेजची विद्यार्थिनी श्रेया गुरवला तीस हजाराची शिष्यवृत्तीन्याय- बंधुता - समता या त्रिसूत्रीवर काम करणार - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

जाहिरात

 

दूध संस्थांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करा, संस्था प्रतिनिधी धडकले सहायक निबंधक कार्यालयावर

schedule27 Apr 26 person by visibility 62 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अवसायन प्रक्रियेतील प्राथमिक दूध संस्थांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण कराव्यात. अद्याप ज्या संस्थांना नोटिसा दिल्या नाहीत त्यांना नोटिसा द्याव्यात, सुनावणी प्रक्रियेतील चालढकलपणा बंद करावा या मागण्या घेऊन शाहूवाडी, राधानगरी व भुदरगड तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी, सोमवारी २७ एप्रिल २०२६ रोजी दुग्ध विभागाच्या सहायक निबंधक कार्यालयावर धडकले. दरम्यान गोकुळ दूध संघांशी निगडीत अवसायन प्रक्रियेतील प्राथमिक दूध संस्थांच्या पात्रतेवरुन सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होती. या सुनावणीसाठी सहायक निबंधक कृष्णा ठाकरे हे कोर्ट कामकाजासाठी कार्यालयाबाहेर होते. दरम्यान प्राथमिक दूध संस्थांची मागणी विचारात घेत ते कोर्टातून कार्यालयात पोहोचले. प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधींनी त्यांना निवेदन दिले. तसेच सुनावणी प्रक्रियेला विलंब लावू नका असा आग्रह धरला. अधिकाऱ्यांनी कार्यालयात वेळेत उपस्थित राहून पारदर्शक पद्धतीने सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या संस्थांच्या सुनावण्या पूर्ण झाल्या आहेत त्या पात्र संस्थेचे निकाल जाहीर करावेत अशी मागणी केली. प्राथमिक दूध संस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास जनावरासहित कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा दिला.यावेळी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील-कुरुकलीकर, बाजार समितीचे सचालक शेखर देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर,  मनोज फराकटे,  भिकाजी एकल, कोनवडेचे एच आर. पाटील, फत्तेसिंह भोसले, अर्जुन पाटील, मधुकर जांभळे, शिवाजी देसाई, मौजे सांगावचे विजयसिंह पाटील, सुरेश बोभाटे आदीसह दूध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes