Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी घेणार तालुकास्तरीय आढावा बैठक, जनता दरबार भरवणार दिवाळीनंतर नागपूर, गोवा, दिल्ली, राजस्थान अन् गुजरातसाठी विमानसेवा - धनंजय महाडिकशाहूवाडीच्या एमआयडीतील गुंतवणुकीसाठी आमदार विनय कोरेंनी घातली कोल्हापुरातील उद्योजकांना सादडीवाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या ! राज्यात तिसऱ्या स्थानी,नवी दिल्लीत सन्मान !!कृष्णराज महाडिक यांच्या युवाशक्ती जागर यात्रेचे सिंधुदुर्गमध्ये जल्लोषी स्वागतन्यू कॉलेजची विद्यार्थिनी श्रेया गुरवला तीस हजाराची शिष्यवृत्तीन्याय- बंधुता - समता या त्रिसूत्रीवर काम करणार - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडशिवसेनेतील निष्ठावंताना विविध नियुक्त्या, पदांच्या माध्यमातून न्याय द्यावाश्री स्वामी समर्थांच्या जीवनावर रॅपसाँग, २४ मे रोजी कोल्हापुरात लॉन्चिंग !आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार अवतारनगरी

जाहिरात

 

दिवाळीनंतर नागपूर, गोवा, दिल्ली, राजस्थान अन् गुजरातसाठी विमानसेवा - धनंजय महाडिक

schedule27 Apr 26 person by visibility 91 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर विमानतळ हे देशातील ‘फॉईव्ह टॉप’मध्ये आहे. शिवाय कोल्हापुरातील हवाई वाहतुकीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध शहरांशी सध्या हवाई कनेक्टिव्हिटी आहे. मुंबईशी नित्याचा विमान प्रवास सुरू आहे. दिवाळीनंतर देशातील महत्वाच्या शहरांसोबत हवाई प्रवासाने जोडले जाणार आहोत. कोल्हापुरातून दिल्ली, नागपूर, गोवा या शहरासह राजस्थान आणि गुजरातला विमान सेवा सुरू होणार आहे.’असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

‘कोल्हापूर फर्स्ट’या उपक्रमाच्या एका वर्षाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार अशोकराव माने, कोल्हापूर फर्स्टचे समन्यवक सुरेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हॉटेल पॅव्हेलियन येथे हा कार्यक्रम झाला.

खासदार महाडिक यांनी कोल्हापूरच्या चौफेर प्रगतीचा आढावा घेतला. कोल्हापूर शहर हे महाराष्ट्रात आघाडीवर असावे या उद्देशाने कोल्हापूर फर्स्ट ही संस्था काम करत आहेत. शहर आणि जिल्हयाच्या विकासासाठी आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहे. कोल्हापूर शहर हे उद्योगाला पूरक आहे. सध्या शहर व जिल्हयात विविध विकास प्रकल्प सुरू आहेत. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनमध्ये प्रवासी वाहतुकींना केंद्रस्थानी ठेवून विकासकामे सुरू आहेत. ४४ कोटी रुपयांच्या विकासनिधीतून रेल्वे स्टेशनला नवा लूक मिळत आहे. विमानतळ अद्ययावत केले.मुंबई ते कोल्हापूर रोज विमान सेवा सुरू आहे. नजीकच्या काळात देशातील मोठया शहराशी विमानसेवेद्वारे कोल्हापूर जोडणार आहे. दिवाळीनंतर गोवा, नागपूर, दिल्ली, राजस्थान, गुजरात येथे विमानसेवेला प्रारंभ होईल.’

वैभववाडी – रत्नागिरी प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या कामालाही चालना मिळाली आहे. पूर्वी हा प्रकल्प ३५०० कोटी रुपयांचा होता. आता त्या प्रकल्पाची किंमत ६३०० कोटीपर्यत वाढली आहे. कोल्हापुरातील कारखानदार, उद्योजकांनीही आता आपआपल्या इंडस्ट्रीजचा विस्तार करावा. बाहेरील गुंतवणूकदार मोठे होण्यापेक्षा येथील कारखानदार, उद्योजकांनी कार्यकक्षा उंचवावी. सोबत सामाजिक बांधिलकी मानावी. सीएसआर फंडातून शहर व जिल्हयात शैक्षणिक, आरोग्यविषयक सुविधा निर्माण कराव्यात. कोल्हापुरातील उद्योजक, कारखानदारीमध्ये मोठी क्षमता आहे. कौशल्ये आहेत. मेनन ग्रुपने इंडस्ट्रीजमध्ये देश आणि जगभरात स्वतंत्र ओळख निर्माण केली. मेनन कुटुंबीय हे मूळचे केरळचे. ते येथील मातीशी समरस झाले. कोल्हापूरशी एकरुप झाले. आज मेनन ग्रुपचा लौकिक सर्वत्र पाहावयास मिळतो.’असे उद्गगारही खासदार महाडिक यांनी काढले.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes