Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी घेणार तालुकास्तरीय आढावा बैठक, जनता दरबार भरवणार दिवाळीनंतर नागपूर, गोवा, दिल्ली, राजस्थान अन् गुजरातसाठी विमानसेवा - धनंजय महाडिकशाहूवाडीच्या एमआयडीतील गुंतवणुकीसाठी आमदार विनय कोरेंनी घातली कोल्हापुरातील उद्योजकांना सादडीवाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या ! राज्यात तिसऱ्या स्थानी,नवी दिल्लीत सन्मान !!कृष्णराज महाडिक यांच्या युवाशक्ती जागर यात्रेचे सिंधुदुर्गमध्ये जल्लोषी स्वागतन्यू कॉलेजची विद्यार्थिनी श्रेया गुरवला तीस हजाराची शिष्यवृत्तीन्याय- बंधुता - समता या त्रिसूत्रीवर काम करणार - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडशिवसेनेतील निष्ठावंताना विविध नियुक्त्या, पदांच्या माध्यमातून न्याय द्यावाश्री स्वामी समर्थांच्या जीवनावर रॅपसाँग, २४ मे रोजी कोल्हापुरात लॉन्चिंग !आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार अवतारनगरी

जाहिरात

 

डीवाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या ! राज्यात तिसऱ्या स्थानी,नवी दिल्लीत सन्मान !!

schedule26 Apr 26 person by visibility 39 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन  :कोल्हापूर येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाला इंडिया हायर एज्युकेशन रँकिंग 2026-27 मध्ये देशात नववे तर राज्यात तिसरे स्थान प्राप्त झाले आहे.  एज्युकेशन वर्ल्ड या प्रतिष्ठित संस्थेकडून जाहीर करण्यात आलेल्या  या मानांकनात खासगी वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या गटात विद्यापीठाने देदीप्यमान कामगिरी केली असून कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी या यशाबद्दल विद्यापीठाच्या सर्व घटकांचे अभिनंदन केले.

शनिवारी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या  पुरस्कार सोहळ्यात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यांनी हा सन्मान स्वीकारला. नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमास 'एज्युकेशन वर्ल्ड'चे व्यवस्थापकीय संपादक सुम्मिया यास्मीन, प्रकाशक/संपादक दिलीप ठाकोर, मुख्य कार्यकारी अधिकारी भाविन शाह, डल्लास कॉलेज, अमेरिकाचे चान्सलर एमेरिटस डॉ. जो डी. मे, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड दास, शोलिनी विद्यापीठ,  हिमाचल प्रदेशचे कुलगुरु अतुल खोसला, ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी, सोनीपतचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अर्पिता गुप्ता,  मणिपाल अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनेश थॉमस, बिट्स पिलानीचे अधिष्ठाता डॉ. अजित प्रताप सिंह, ग्रीनलाइट क्रेडेन्शियल्स, अमेरिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुट्टी, ब्रिटिश कौन्सिल कंट्री डायरेक्टर अॅलिसन बॅरेट यांच्यासह देशभरातील नामांकित शिक्षणतज्ज्ञ, कुलगुरू, प्राध्यापक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या रँकिंगसाठी देशभरातील सुमारे 2100 हून अधिक शिक्षण क्षेत्रातील जाणकारांशी संवाद, प्रत्यक्ष पाहणी, शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, संशोधन कार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा सखोल अभ्यास करण्यात आला. यामध्ये डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाने  आपली गुणवत्ता सिद्ध करत उच्च स्थान पटकावले.

या यशाबद्दल कुलपती डॉ संजय डी. पाटील यांनी अतिशय समाधान व्यक्त केले.  विद्यापीठाचे सर्व अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश आहे. आगामी काळात विद्यापीठ जागतिक स्तरावर  नक्कीच नावलौकिक मिळवेल असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes