Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षकांचा प्रशिक्षणामधील अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित करावा : भरत रसाळेगोकुळच्या राजकारणात महादेवराव महाडिकांची एंन्ट्री, निवडणुकीसाठी ठोकला शड्डू ! सत्ताधारी नेतृत्वावर डागली तोफ !गोकुळचे  चेअरमन-संचालकांनी घेतली अजित पवारांची भेट, दुग्ध व्यवसायसंबंधी चर्चा !!जेईई अॅडव्हान्स परीक्षेत विवेकानंद  कॉलेजचे यश महापालिका निवडणुकीसाठी भाजपा मैदानात, ८१ प्रभागात नागरिकांसाटी शिबिरेभालकर्स कला अकादमीचे पुरस्कार जाहीर ! अनिल वेल्हाळ, सतीश रणदिवे, दिलीप बापट, प्रवीण कोडोलीकरांचा समावेश !!केआयटीतर्फे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंबंधी रविवारी मार्गदर्शन कार्यक्रमवडगावमध्ये उभारणार १०० खाटांचे हॉस्पिटल ! खासदार-आमदारांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक !! शिक्षक त्रस्त, दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन ! प्रशिक्षण नावापुरतेच, प्रशिक्षणाची वेळही गैरसोयीची !!देशभरातील टॉप टेन संशोधकात शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रमोद पाटील !

जाहिरात

 

सुवर्णा सावंत यांनी स्वीकारला माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाचा कार्यभार

schedule03 Jun 25 person by visibility 2436 category

: महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून  सुवर्णा शिवाजी सावंत या रुजू झाल्या. माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर  यांची शिक्षण विभाग योजनाचे शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर सावंत यांची नियुक्ती झाली आहे. सावंत यांनी मंगळवारी  (3  जून 2025), शिक्षणाधिकारी आंबोकर यांच्याकडून  पदभार स्वीकारला.
 सावंत या रत्नागिरी जिल्हा परिषद येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी होत्या. यापूर्वी सावंत यांनी रत्नागिरी पंचायत समिती येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले आहे. कोल्हापुरात त्यांनी विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदावर यापूर्वी काम केले आहे. कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल येथे त्या प्राचार्य होत्या. शिवाय कागल, पन्हाळा, गगनबावडा पंचायत समिती येथे गटशिक्षणाधिकारी पदाचा  कार्यभार सांभाळला होता.  कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ येथे सहाय्यक सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes