Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या जागा पंचवीस, मागणी 29 ची ! महायुतीची मुंबईतील चर्चा निष्फळ, दोन दिवसांनी निर्णय !!समविचारी आघाडी सत्तेवर आल्यास कात्यायनी परिसरात अत्याधुनिक म्हैस खरेदी केंद्र उभारणार - आमदार सतेज पाटीलअभाविपचे विद्यापीठात आंदोलन, सुरक्षारक्षकांशी झटापटयुवराज संभाजीराजे, आमदार विनय कोरे, अमल महाडिकांना कुस्ती पोशिंदा पुरस्कार, शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजनधम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी धम्मविचार साहित्य संमेलनडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअपविकसित कोल्हापूर २०४७ साठी राज्यपालांकडे कोल्हापूर फर्स्टची भूमिकाभागीरथीची झिम्मा फुगडी स्पर्धा रद्द, बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीलाघरगुती - व्यावसायिक वापराच्या साखरेसाठी वेगवेगळे दर आवश्यक -आमदार अमल महाडिकलग्न ठरवायला मुंबईला गेले अन् मुख्यमंत्री नागपूरला अशी विरोधकांची अवस्था - सतेज पाटलांचा महायुतीला टोला

जाहिरात

 

डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप

schedule30 Sep 26 person by visibility 65 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :शिक्षण घेत असतानाच स्वतःच्या कल्पनेला व्यावसायिक स्वरूप देत उद्योजकतेची नवी वाट चोखाळणाऱ्या कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या दोन विद्यार्थ्यांनी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला आहे. संगणक विज्ञान व अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या निखिल चव्हाण आणि सिद्धेश धुंदरे यांच्या ‘श्रावणी नेक्सटेक’ या आयटी सेवा पुरविणाऱ्या स्टार्टअपला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

वडिलांच्या मित्रांना जाणवणाऱ्या विविध आयटीविषयक गरजा लक्षात घेऊन त्यांनी त्यावर तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करण्यास सुरुवात केली. संकल्पनेला प्रत्यक्ष व्यवसायाचे रूप देत त्यांनी ‘श्रावणी नेक्सटेक’ची सुरुवात केली असून, आता त्यांना विविध प्रकल्पांची कामेही मिळू लागली आहेत. ‘श्रावणी’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘ऐकणे आणि शिकणे’ असा होतो. ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार तंत्रज्ञानाधारित सेवा देणे, हे या स्टार्टअपचे वैशिष्ट्य आहे. वेबसाईट डिझाइन, डिजिटल मार्केटिंग, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजना अशा विविध सेवा येथे दिल्या जातात. या कामासाठी विविध २० हून अधिक तंत्रज्ञानांचा वापर केला जात आहे.

प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले, डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करून विद्यार्थी दशेतच स्टार्टअप सुरू करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते भविष्यात सक्षम उद्योजक बनू शकतात. या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. महादेव नरके, संगणक विभागप्रमुख डॉ. पी. के. शिंदे, प्रा. शीतल साळोखे व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य नरके यांनी निखिल व सिद्धेश यांचे अभिनंदन केले

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes