Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
घरगुती - व्यावसायिक वापराच्या साखरेसाठी वेगवेगळे दर आवश्यक -आमदार अमल महाडिकलग्न ठरवायला मुंबईला गेले अन् मुख्यमंत्री नागपूरला अशी विरोधकांची अवस्था - सतेज पाटलांचा महायुतीला टोलागोकुळचे माजी संचालक सत्यजीत सुरेश पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशराज्यपालांच्यासोबत डॉ संजय डी. पाटलांचा संवाद ! कृषी, साखर उद्योग, दूध व्यवसाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी चर्चा !!पदवीधरांचे रोजगार - आर्थिक प्रश्न घेऊन प्रा. एन. डी. चौगले पदवीधर निवडणुकीच्या मैदानातराज्यपालांनी साधला कोल्हापुरात मान्यवरांशी संवाद ! असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्टचे ४७ वे वार्षिक मॅपकॉन अधिवेशन कोल्हापुरातअपयशाकडे अपयश म्हणून नको त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहा –नेमबाज सोनम मस्करकोरे अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांची दक्षिण आफ्रिकेतील कंपनीत  निवडफुलेवाडी परिसरात बिबट्या, वनविभागाकडून शोध ! पोलिस फौजफाटा तैनात ! !

जाहिरात

 

लग्न ठरवायला मुंबईला गेले अन् मुख्यमंत्री नागपूरला अशी विरोधकांची अवस्था - सतेज पाटलांचा महायुतीला टोला

schedule29 Sep 26 person by visibility 73 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘सध्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती अत्यंत गमतीशीर आणि सावळा गोंधळ निर्माण करणारी झाली आहे. 'लग्न ठरवायला मुंबईला गेले आणि मुख्यमंत्री नागपूरला गेले' अशी अवस्था विरोधकांची झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या या स्वाभिमानी कोल्हापूर जिल्ह्याने कधीही आपला स्वाभिमान गहाण ठेवला नाही. परंतु, आज काही लोक मुख्यमंत्र्यांच्या दारी जाऊन स्वाभिमान गहाण ठेवण्याचे काम करत आहेत. जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना हे अजिबात पटलेले नसून, सामान्य शेतकरी आमच्या आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील’ असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आज राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचारार्थी शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या यामध्ये माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर, जिल्हा परिषद सदस्य विजय बोरागे, अमरसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, सर्जेराव पाटील विलास पाटील, श्रीमती रत्नप्रभा पाटील भेडसगावकर, उदगीरी शाहूवाडी खरेदी विक्री संघाचे महादेव पाटील, शाहूवाडी चे माजी उपसभापती महादेव पाटील, उदय पाटील भेडसगावकर, डॉ मीरा पाटील भेडसगावकर, विजय पाटील भेडसगावकर, प्रमोद चौगुले, यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर प्राथमिक दूध संस्थांच्या ठरावधारकांचा भव्य मेळावा सरूड येथे पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर हे होते.

‘ सरूडकर गटाची २५३ ठरावधारकांची भक्कम साथ आमच्या समविचारी आघाडीला मिळाली असून या पाठिंब्यामुळे आघाडीचा विजय आता अधिक सोपा आणि सुकर झाला पन्हाळा - शाहूवाडी तालुक्यातील आम्ही पाटील बंधू एकत्र येऊन काम करणार आहोत. यामुळे पुढील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उभारी निर्माण होईल." असल्याचे राजर्षी शाहू शेतकरी समविचार आघाडीचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

माजी सत्यजीत पाटील सरूडकर यांनी सांगितले की, सहकार क्षेत्रात यापूर्वी कधीही पक्षीय राजकारण आले नव्हते. मात्र, आजच्या परिस्थितीमुळे 'शेण-काडी करणाऱ्या, दूध काढणाऱ्या सामान्य शेतकऱ्याचा गोकुळ राहिला आहे का?' असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधी नेत्यांना आपलेच ठरावधारक सांभाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत धाव घ्यावी लागत आहे, हाच त्यांचा ठरावधारकांवर अविश्वास असल्याचे स्पष्ट होते. जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह हंबीरराव पाटील यांनी सांगितले, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील ठरावधारकांचा कौल पूर्णपणे सतेज पाटील यांच्या बाजूने आहे. माजी संचालक रणजितसिंह पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर आणि बाबासाहेब देवकर यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या योगदानाचे स्मरण केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes