Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या जागा पंचवीस, मागणी 29 ची ! महायुतीची मुंबईतील चर्चा निष्फळ, दोन दिवसांनी निर्णय !!समविचारी आघाडी सत्तेवर आल्यास कात्यायनी परिसरात अत्याधुनिक म्हैस खरेदी केंद्र उभारणार - आमदार सतेज पाटीलअभाविपचे विद्यापीठात आंदोलन, सुरक्षारक्षकांशी झटापटयुवराज संभाजीराजे, आमदार विनय कोरे, अमल महाडिकांना कुस्ती पोशिंदा पुरस्कार, शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजनधम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी धम्मविचार साहित्य संमेलनडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअपविकसित कोल्हापूर २०४७ साठी राज्यपालांकडे कोल्हापूर फर्स्टची भूमिकाभागीरथीची झिम्मा फुगडी स्पर्धा रद्द, बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीलाघरगुती - व्यावसायिक वापराच्या साखरेसाठी वेगवेगळे दर आवश्यक -आमदार अमल महाडिकलग्न ठरवायला मुंबईला गेले अन् मुख्यमंत्री नागपूरला अशी विरोधकांची अवस्था - सतेज पाटलांचा महायुतीला टोला

जाहिरात

 

धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी धम्मविचार साहित्य संमेलन

schedule30 Sep 26 person by visibility 32 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी (चार ऑक्टोबर २०२६) धम्म विचार साहित्य व संस्कृती संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात धम्मविचार, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाच्या विविध पैलूंवर दिवसभर चर्चा होईल. अॅड. कृष्णा पाटील,  धम्म अभ्यासक भदंत एस संबोधी, दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी १०.३ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती ट्रस्टच्या अध्यक्षा अॅड. करुणा विमल यांनी दिली.या संमेलनात धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार सचिन मून, अभ्यासक रंगराव पांडे यांना दिला जाणार आहे. पत्रकार परिषदेला डॉ. स्वाती नांगरे, सुप्रभा चोपडे, विश्वास तरटे, सुनील जाधव, विमल पोखर्णीकर आदी उपस्थित होते. शाहू स्मारक भवन येथे संमेलन आयोजित केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes