Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या जागा पंचवीस, मागणी 29 ची ! महायुतीची मुंबईतील चर्चा निष्फळ, दोन दिवसांनी निर्णय !!समविचारी आघाडी सत्तेवर आल्यास कात्यायनी परिसरात अत्याधुनिक म्हैस खरेदी केंद्र उभारणार - आमदार सतेज पाटीलअभाविपचे विद्यापीठात आंदोलन, सुरक्षारक्षकांशी झटापटयुवराज संभाजीराजे, आमदार विनय कोरे, अमल महाडिकांना कुस्ती पोशिंदा पुरस्कार, शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजनधम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी धम्मविचार साहित्य संमेलनडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअपविकसित कोल्हापूर २०४७ साठी राज्यपालांकडे कोल्हापूर फर्स्टची भूमिकाभागीरथीची झिम्मा फुगडी स्पर्धा रद्द, बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीलाघरगुती - व्यावसायिक वापराच्या साखरेसाठी वेगवेगळे दर आवश्यक -आमदार अमल महाडिकलग्न ठरवायला मुंबईला गेले अन् मुख्यमंत्री नागपूरला अशी विरोधकांची अवस्था - सतेज पाटलांचा महायुतीला टोला

जाहिरात

 

युवराज संभाजीराजे, आमदार विनय कोरे, अमल महाडिकांना कुस्ती पोशिंदा पुरस्कार, शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजन

schedule30 Sep 26 person by visibility 71 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र कुस्ती संघटनेतर्फे शुक्रवारी (२ ऑक्टोबर २०२६) कुस्तीक्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत राजर्षी शाहू कुस्तीचा पोशिंदा पुरस्कार युवराज संभाजीराजे, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, करमाळा येथील आमदार नारायण आबा पाटील, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, यांना प्रदान करण्यात येणार आहे. शाहू स्मारक भवन येथे दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कुस्ती संघटनेचे प्रमुख पैलवान संग्राम कांबळे यांनी दिली.  या कार्यक्रमासाठी भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर, रणजीत खाशाबा जाधव, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची प्रमुख उपस्थिती आहे. या कार्यक्रमात हिंदकेसरी दिनानाथ सिंह, ऑलिम्पिकवीर पैलवान बंडा पाटील रेठरेकर, ज्येष्ठ छायाचित्रकार बापू मकानदार यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय विशेष गौरव पुरस्कार, कुस्ती सेवक पुरस्कार मिळून ४२ जणांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पत्रकार सचिन यादव, सागर यादव, सचिन भोसले, प्रमोद व्हनगुत्ते, संगम कांबळे यांना क्रीडा पत्रकार पुरस्कार दिला जाणार आहे. पत्रकार परिषदेला महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संभाजीराव पाटील कुडित्रेकर, पैलवान सिताराम कांबळे, सचिन राठोड, चंद्रदीप कांबळे, अमित गायकवाड आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes