Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली प्रशासकीय मंडळची भेटसर्जन्स वीकनिमित्त कोल्हापूर सर्जिकल सोसायटीतर्फे सामाजिक उपक्रम चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांचे पॅनेल विजयी, 17 पैकी सोळा जागा जिंकल्यामहामानवांच्या विचारकार्यांचे नियोजनबद्ध संशोधन व्हावे - पालकमंत्री प्रकाश आबिटकर वीरशैव लिंगायत समाजातर्फे गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कारविकास प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव…नांगरट साहित्य संमेलनात सरकारी धोरणावर ओढले आसूडकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेच्या भोगावती शाखेचा प्रथम वर्धापनदिन साजरागोकुळमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजराचित्रपट महामंडळासाठी कोल्हापूर-पुण्यात चुरशीने मतदान, सोमवारी मतमोजणीडॉ. जे. के. पवार लिखित राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

जाहिरात

 

शिवराज्याभिषेक दिन सोहळयानिमित्त मराठा महासंघातर्फे मिरवणूक

schedule07 Jun 26 person by visibility 61 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, ढोल ताशांचा गजर, महिलांच लेझीम पथक, विविध विषयावरील चित्रमय फलक आणि शिवछत्रपतींचा जयघोष अशा उत्साही वातावरणात अखिल भारतीय मराठा महासंघ, कोल्हापूर शाखेतर्फे  शिवराज्याभिषेक दिन सोहळयानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. मंगळवार पेठ ते छत्रपती शिवाजी चौकपर्यंत निघालेल्या या मिरवणुकीत शिवभक्त मोठया संख्येने सहभागी झाले.

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळयानिमित्त मराठा महासंघ व सामाजिक सलोखा मंचतर्फे मिरवणुकीचे आयोजन केले होते. खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते व आमदार सतेज पाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिरवणुकीचे उद्घाटन झाले. मिरवणुकीत छत्रपती शिवरायांचा आकर्षक पुतळा लक्ष वेधून घेत होता. राजमाता जिजाऊ, शिवराय आणि मावळयांच्या वेशभूषेतील बाल चमू, महिलांचे लेझीम पथक, धनगरी ढोल, वारकऱ्यांचा सहभाग ही मिरवणुकीचे वैशिष्ट्ये ठरली.

मराठा महासंघाच्या कार्यालयापासून सुरू झालेली मिरवणूक कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटीमार्गे बिनखांबी गणेश मंदिरकडे मार्गस्थ झाली. महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे छत्रपती शिवाजी चौकपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, उदय देसाई, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत, मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या शैलजा भोसले, चंद्रकांत चव्हाण, शंकरराव शेळके,  नगरसेविका अनुराधा मुळीक, नगरसेवक विनायक फाळके, सचिन शेंडे, अॅड. धनंजय पठाडे, संभाजी जगदाळे, अजित सासने, अशेक पोवार, प्रसाद जाधव, किशोर घाटगे, बबन रानगे, कादर मलबारी, किरणसिंह चव्हाण, मिलिंद सावंत, माजी नगरसेवक अशोक भंडारे आदींचा मिरवणुकीत सहभाग होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes