Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचाबार असोसिएशनमध्ये गटतट न आणता खंडपीठाचा लढा यशस्वी करू – नूतन पदाधिकारी-कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्दस्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचा आदेशटॉप वीस शिक्षकांमध्ये पदवीधर शिक्षिका अर्चना सुतार, कविता सरदेसाई !कुशिरेच्या ज्योती चव्हाणचे बारावी परीक्षेत लख्खं यशबारावी परीक्षेत विवेकानंद कॉलेजच्या गुणवत्तेची परंपरा कायमगोखले कॉलेजचा बारावीत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्केप्रशासनाची अॅक्शन, प्रदीप हुपरे निलंबित ! सदाशिव येजरेंचा कबुलीनामा !!शिवाजी विद्यापीठासाठी नव्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात, शोध समितीसाठी नावांची शिफारसचंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर, शिक्षण सहसंचालक कार्यालयांची तपासणी होणार ! कामत समितीची स्थापना !!

जाहिरात

 

व्यवसाय परवाना नूतनीकरण फी दरवाढ मागे ने घेतल्यास बुधवारी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन

schedule28 Apr 25 person by visibility 335 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महागरपालिका परवाना विभागाने व्यवसाय परवाना फीमध्ये केलेली दरवाढ मागे न घेतल्यास ३० एप्रिल २०२५ रोजी महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभेत घेण्यात आला.

अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, ‘२०२५-२०२६ वर्षासाठी परवाना विभागाने केलेली दरवाढ अन्यायकारक आहे. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देऊन परवाना फी दरवाढ मागे घेण्यासाठी निवेदन सादर केले होते. तसेच ३ एप्रिल रोजी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, परवाना अधिक्षक अशोक यादव यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्या बैठकीत सदर परवाना फी दरवाढ मागे घ्या अन्यथा एकही परवाना धारक आपला परवाना नूतनीकरण करणार नसल्याचा इशारा देण्यात आला. पुन्हा एकदा रोकडे यांची भेट घेऊन परवाना नूतनीकरण दरवाढ मागे घेणे व नूतनीकरणास मुदतवाढ देण्याबाबत विचारले. तेव्हा त्यांनी महापालिकेच्या उपसमितीची बैठक असून त्या बैठकीत यावर निर्णय घेऊ असे सांगितले. उपसमितीच्या बैठकीत परवाना नूतनीकरणास मुदतवाढ न दिल्यास आंदोलन छेडावे लागेल.’

उपाध्यक्ष धनंजय दुग्गे यांनी व्यापाऱ्यांचा परवाना फी व अग्निशमन कर बाबत गेल्या ७ वर्षांपासून लढा सुरु असून व्यापाऱ्यांनी आपली एकजूट कायम राखावी असे आवाहन केले. मानद सचिव अजित कोठारी यांनी, आठ दिवस उलटूनही परवाना नूतनीकरणाबाबत लेखी आश्वासन न दिल्याने महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करावे लागेल असे सांगितले. यावेळी टिंबर व्यापारी संघाचे सचिव लक्ष्मण पटेल, स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर आगरवाल, हॉटेल मालक संघाचे सचिन शानबाग, केमिस्ट असोसिएशनचे दाजिबा पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, खजिनदार राहुल नष्टे, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, रेडिमेड गारमेंट डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित मेहता, रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनचे अनिल धडाम, नारळ व्यापारी संघाचे अविनाश नासिपुडे उपस्थित होते. मानद सचिव वैभव सावर्डेकर यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes