टॉप वीस शिक्षकांमध्ये पदवीधर शिक्षिका अर्चना सुतार, कविता सरदेसाई !
schedule06 May 25 person by visibility 180 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था कोल्हापूर, जिल्हा परिषद कोल्हापूर व अमेझॉन व लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कॉम्पिटेशनल थिंकिंग ,कोडींग व सिक्वेनसिंग या कोडींग संकल्पनांवर आधारित ‘अमेझॉन फ्युचर इंजिनियर्स –सीएसटीई’ हा ऑनलाइन कोर्स घेण्यात आला. यामध्ये कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील पदवीधर शिक्षिका अर्चना सुतार (श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर) व कविता सरदेसाई (प्रिन्स शिवाजी विद्यालय जाधववाडी) यांनी उत्कृष्ट यश मिळवत जिल्ह्यातील टॉप वीस शिक्षकांमध्ये स्थान मिळवले. या कोर्ससाठी जिल्ह्यातून ९१० शिक्षकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४८ शिक्षकांनी हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला. या कोर्समध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या टॉप २० शिक्षकांच्या शाळांना डिजिटल साहित्य व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.