कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव- बसव जयंती कार्यक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन
schedule12 Apr 26 person by visibility 28 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाज , दक्षिण महाराष्ट्र वीरशैव लिंगायत समाज व श्री वीरशैव अक्कमहादेवी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीत शिव- बसव जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमातंर्गत कॅरम स्पर्धा, पाक कला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पारंपारिक वेशभूषा स्पर्धा, स्तोत्र व श्लोक पठाण स्पर्धा, प्ले आर्ट, डान्स अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. कॅरम स्पर्धेने सुरुवात झाली. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक व प्रा.प्रबोधिनी पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु बसवेश्वर महाराज व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमा पूजन करून स्पर्धेची सुरुवात झाली. याप्रसंगी बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले, ‘महात्मा बसवेश्वर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार समाजसुधारणेच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारक होते. त्यांनी मांडलेल्या समता, न्याय, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यामुळे आजही समाजाला प्रेरणा मिळते. त्यामुळे त्यांच्या वैचारिक समानतेचा अभ्यास केल्यास समताधिष्ठत समाज निर्माण करण्याची दिशा आपल्याला मिळते.’ यावेळी समाजाचे अध्यक्ष किरण गवळी यांच्या हस्ते महाडिक यांचा सत्कार झाला. प्रा. पाटील यांचा सत्कार स्मिता हळदे यांनी केला. कॅरम स्पर्धेसाठी सत्यजित सांगावकर, उदय करपे, सुरेश मांजरेकर, यांनी परिश्रम घेतले.
१९ एप्रिल रोजी सकाळी समाजातील युवक युवतींची बाईक रॅली आयोजित केली आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवबसव प्रतिमा पूजन होईल. वरद शंकर महापूजा, रक्तदान शिबिर तसेच अक्कमहादेवी महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. डॉ. विश्वास सुतार यांचे ‘महात्मा बसवेश्वर जीवन व कार्य नव्या पिढीला संदेश’ या विषयावर व्याख्यान आहे. दुपारी बरोबर बारा वाजता बसवेश्वरांचा जन्मोत्सव कार्यक्रम होईल. सायंकाळी पालखी मिरवणूक, महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे. अशी माहिती सचिव सुनील गाताडे यांनी दिली.
यावेळी राजेश पाटील (चंदुरकर), सुहास भेंडे, चंद्रकांत हळदे, चंद्रकांत नासीपुडे, संजय बोधले, राजेंद्र करंबळी, प्रशांत करंबळी, धर्मेंद्र नष्टे, गणेश सन्नकी, अविनाश नासीपुडे,केतन तवटे, सत्यजित सांगावकर, गुरुदेव स्वामी, उदय करपे, महिला मंडळाच्या अध्यक्षा मंदा कुलकर्णी, उपाध्यक्ष अमृता करंबळी, सचिव मंदाकिनी सावर्डेकर, द्राक्षायणी हिरेमठ, अनुपमा श्रेष्ठी, संगीता करंबळी, सविता सन्नक्की, भाग्यश्री खोबरे, अन्विशा नासीपुडे वंदना बंबलवाड,पूनम सांगावकर, गीता कागले, विद्या बनसोडे, तृप्ती सांगावकर,सुवर्णा झगडे उपस्थित होते. राहुल नष्टे यांनी आभार मानले.