Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमदार सतेज पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ! विविध सामाजिक उपक्रम, गर्दीचा महापूर! !कोल्हापुरातील ब्राह्मण शेतकरी मेळाव्याला प्रतिसाद ! पुरस्कार वितरण, तज्ज्ञांची व्याख्याने ! !णण तयकोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव- बसव जयंती कार्यक्रम, विविध स्पर्धांचे आयोजनपंजाबराव डख म्हणाले, १९ ते २६ एप्रिल या कालावधीत पाऊस अन् गारपीठ…कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिका- कोल्हापूर फर्स्ट एकत्र काम करणारवडणग्याचं पोरगं : आत्मकथनातून उलगडला संघर्ष-समाजभान-मूल्यनिष्ठेचा प्रवासकोल्हापूरच्या मातीने मला संस्कार दिले, पुरस्काराने मातीचे ऋण फेडण्याची जाणीव - गायिका श्रृती सडोलीकर - काटकरआमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध उपक्रमरामशेठ ठाकुरांनी दिली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला पंचवीस लाखाची देणगी

जाहिरात

 

आमदार सतेज पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ! विविध सामाजिक उपक्रम, गर्दीचा महापूर! !

schedule12 Apr 26 person by visibility 47 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस रविवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून विधायक उपक्रम राबवत दातृत्वाचा जागर केला. आमदार पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार यावेळी शुभेच्छा लाखो वह्या संकलित झाल्या असून लवकरच गरजू विद्यार्थ्यांना त्या वितरीत केल्या जाणार आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीतील मोठ्या यशामुळे यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांमध्ये  अधिकच उत्साह होता.  आमदार सतेज पाटील यांनी  पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील आणि शांतादेवी डी. पाटील यांचे शुभाशीर्वाद घेतले.   डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, मेघराज काकडे, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, करण काकडे,  तेजस पाटील, वैजयंती पाटील, प्रतिमा पाटील, राजश्री काकडे, पूजा पाटील, वृषाली पाटील, स्नेहा पाटील, देवश्री पाटील, अर्जुन व आर्यमन पाटील यांनी आमदार पाटील यांना शुभेच्छा देत वाढदिवस उत्साहात साजरा केला.

‘यशवंत निवास' समोर उभारलेल्या मंडपामध्ये दुपारी तीन वाजल्यापासून  शुभेच्छा देण्यासाठी  विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गेली १६ वर्षे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ ऐवजी वह्यांच्या स्वरूपात  शुभेच्छा स्वीकारण्याचा उपक्रम आमदारपाटील यांच्याकडून राबवला जातो. कोल्हापूर महानगरपालिका काँग्रेस नगरसेवक आणि गगनबावडा तालुका काँग्रेस यांच्याकडून प्रत्येकी ५४ हजार वह्या भेट देण्यात आल्या. याशिवाय विविध संघटना कार्यकर्ते यांच्याकडून लाखो वह्या भेट म्हणून संकलित झाल्या. महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी वह्या भेट दिल्या.

…………..

नेतेमंडळींनी दिल्या शुभेच्छा

राष्ट्रवादीचे  प्रफुल पटेल, अखिल भारतीय काँग्रेसचे बी. संदीप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम बी पाटील,खासदार रवींद्र चव्हाण, गणेश हुक्केरी, माजी खासदार रजनी पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार सत्यजीत देशमुख, राजेश पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री रमेश बागवे, नसीम खान, समित कदम, माजी खासदार निवेदिता माने, वीरकुमार पाटील, यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes