Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमदार सतेज पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ! विविध सामाजिक उपक्रम, गर्दीचा महापूर! !कोल्हापुरातील ब्राह्मण शेतकरी मेळाव्याला प्रतिसाद ! पुरस्कार वितरण, तज्ज्ञांची व्याख्याने ! !णण तयकोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव- बसव जयंती कार्यक्रम, विविध स्पर्धांचे आयोजनपंजाबराव डख म्हणाले, १९ ते २६ एप्रिल या कालावधीत पाऊस अन् गारपीठ…कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिका- कोल्हापूर फर्स्ट एकत्र काम करणारवडणग्याचं पोरगं : आत्मकथनातून उलगडला संघर्ष-समाजभान-मूल्यनिष्ठेचा प्रवासकोल्हापूरच्या मातीने मला संस्कार दिले, पुरस्काराने मातीचे ऋण फेडण्याची जाणीव - गायिका श्रृती सडोलीकर - काटकरआमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध उपक्रमरामशेठ ठाकुरांनी दिली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला पंचवीस लाखाची देणगी

जाहिरात

 

पंजाबराव डख म्हणाले, १९ ते २६ एप्रिल या कालावधीत पाऊस अन् गारपीठ…

schedule12 Apr 26 person by visibility 172 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी, १९ ते २६ एप्रिल या कालावधीत कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोकणसह राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस आणि २१ तारखेनंतर गारपीठचीही शक्यता वर्तविली आहे. कर्नाटकातील विविध भागातही पाऊस होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा पाऊस जेमतेम आहे, सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे. मात्र शेतकरी मालामाल बनेल असेही ते म्हणाले.

पंजाबराव डख हे रविवारी, (बारा एप्रिल २०२६ ) कोल्हापूर दौऱ्यावर होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ब्राह्मण शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी त्यांनी संवाद साधला. पंजाबराव डख म्हणाले, ‘ शेतकऱ्यांनी निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती करू नये. निसर्गाशी जुळते घेऊनच शेती करायला हवी. वातावरणातील बदल, बदलते हवामान यामुळे मॉन्सूनच्या आगमनाची वेळ पुढे जात आहे. साधारणपणे दरवर्षी सात जूनला मॉन्सूनचे आगमन होते. यंदा मात्र मॉन्सून जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबणीवर पडू शकतो असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. इराण, अमेरिका युद्धाचा आपल्याकडील हवामान आणि पावसावर काही परिणाम होणार नाही असेही ते म्हणाले.

कोल्हापुरात २०१९ आणि २०२१ मध्ये महापूर आला होता, त्या महापुरासंबंधी आपण अगोदरच अंदाज वर्तविले होते याकडे लक्ष वेधत डख म्हणाले, ‘आमच्या कुटंबांत पिढीजात हवामान अभ्यासाचा पिढीजात वारसा लाभला आहे. आजोबा, वडील हे पावसाचा अचूक अंदाज वर्तवित. मी, आठवीत शिकत असल्यापासून पावसाचा अंदाज व्यकत करत आहे. हवामान अभ्यासक म्हणून एक गोष्ट नमूद करतो, यंदा रामफळ जोमदार आले आहे. ज्या वर्षी रामफळ जास्त प्रमाणात उत्पादित होते, त्यावर्षी पाऊस कमी. तसेच यंदा चिंच बहरला आहे. चिंच बहरला, चिंचेचे उत्पादन जास्त झाले की पाऊस कमी, पण त्यावर्षी शेतकरी मालामाल होतो.’

आगामी काही वर्षातील पावसाचा अंदाजही त्यांनी वर्तविला. ते म्हणाले, ‘२०२६ मध्ये जेमतेम पाऊस मात्र २०२७ व २०२८ या दोन वर्षी भरपूर पाऊस आहे. २०२९ मध्ये पुन्हा जेमतेम पाऊस, मात्र त्यापुढील दोन वर्षे म्हणजे २०३० व २०३१ मध्ये जोरदार पाऊस आहे. २०३२ मध्ये पुन्हा पाऊस कमी आहे. आणि २०३३ व २०३४ मध्ये पाऊस भरपूर अशी स्थिती राहील.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes