शरद पवारांचे विमानतळावर स्वागत, स्थानिक स्वराज्यच्या निवडणूक कामाला लागण्याच्या सूचना
schedule24 Apr 25 person by visibility 139 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माजी केंद्रीयमंत्री शरद पवार हे दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यानिमित्त गुरुवारी (२४ एप्रिल) काही वेळ कोल्हापूर विमानतळावर होते. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. ‘पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामला लागावे’असे आवाहन पवार यांनी केले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळ व्हीआयपी कक्षामध्ये पवार यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा आढावा घेतला. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीसाठीचे सर्वाधिकार त्या-त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून जिल्हाध्यक्षांनीच निर्णय घ्यावे असे धोरण आम्ही ठरवत आहोत असे सांगितले असे पवार यांनी सांगितले. निवडणुकीच्या निकालावरही चर्चा केली, नाराज न होता कामाला लागा. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम प्रदेशकडून होईल या शब्दांत आश्वस्त केले.
इंडिया आघाडी बद्दलही पवार यांनी विचारणा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील यांनी, ‘खासदार शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे काम चालू असल्याचे सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष अनिल घाटगे, सरचिटणीस सुनील देसाई, युवक अध्यक्ष रोहित पाटील, ज्येष्ठ नेते बाजीराव खाडे उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांची चर्चा झाल्यानंतर पवार हे हेलिकॉप्टरने वेंगुर्लाकडे रवाना झाले. शुक्रवारी ते गवसे, आंबोली या ठिकाणी ऊस संशोधन केंद्राला भेट देणार आहेत. त्यांच्या सोबत प्रतिभा पवार आहेत.