राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी शरद गोसावी
schedule03 Nov 21 person by visibility 3223 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी शरद गोसावी यांची नियुक्ती झाली आहे. राज्य मंडळाचा त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असेल. सध्या ते अमरावती विभागीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गोसावी हे मूळचे, कोल्हापूरचे आहेत. गोसावी यांनी शिक्षण विभागात विविध अधिकारपदावर काम केले आहे. जिल्हा परिषदेत प्राथमिक व माध्यमिक विभागात शिक्षणाधिकारी म्हणून केले आहे. तसेच कोल्हापूर विभागीय मंडळाचे ते सचिव होते.