Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळपहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार;  शाळा कृती समिती - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जाहीरठरावधारकांच्या बैठकीत महायुतीमधील पदाधिकाऱ्यांत वादावादी, शपथ घेण्यावरुन  विषय चिघळलाशंकर खंडू पाटील जन्मशताब्दी सरकारतर्फे साजरी होणार, कोल्हापुरात १४ नोव्हेंबरला कार्यक्रमकोल्हापूरचा स्वाभिमान राखण्यासाठी समविचारी आघाडीला  विजयी करा - सतेज पाटीलसेवा संकल्प अभियानातून विद्या मंदिर, भेंडाई धनगरवाडा शाळेला नवे रूपकरवीर तालुका डाग पुसून काढणार, ठरावधारकांचा निर्धार ! महायुतीच्या नेतेमंडळीत आणाभाका ! ! लढा दूध उत्पादकांच्या हितासाठी…दृष्टी गोकुळच्या विकासाची !कोल्हापुरात बुधवारी उद्योग संवाद कार्यक्रमएकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

जाहिरात

 

शंकर खंडू पाटील जन्मशताब्दी सरकारतर्फे साजरी होणार, कोल्हापुरात १४ नोव्हेंबरला कार्यक्रम

schedule13 Oct 26 person by visibility 58 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : मराठीतील ख्यातनाम कथाकार शंकर खंडू पाटील यांची जन्मशताब्दी राज्य सरकारतर्फे साजरी केली जाणार आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने कोल्हापूर येथे १४ नोव्हेंबर रोजी जन्मशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या सहकार्याने हा कार्यक्रम होईल.

   शंकर खंडू पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासंदर्भात दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे माजी अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे प्रस्ताव मांडला. साहित्य सभेचे अध्यक्ष डॉ. विनोद कांबळे, कार्याध्यक्ष दि. बा. पाटील, भीमराव धुळुबुळू आदींनी त्याचा पाठपुरावा केला. त्यानुसार सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी त्यासंदरभातील निर्णय जाहीर केला आहे. जन्मशताब्दीचा कार्यक्रम १४ नोव्हेंबर २०२६ रोजी कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवनात होणार आहे. कार्यक्रमाचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल.
    शंकर खंडू पाटील यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९२५ रोजी पेठ (जि. सांगली) येथे झाला. त्यांचे वास्तव्य बराच काळ कोल्हापूर येथेच राहिले. कथा, कादंबरी, चित्रपट कथा-पटकथा याबरोबरच राजकीय, सामाजिक विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले. चोरा मी वंदिले, सागराचे पाणी, सवाल, बाजिंदा हे त्यांचे चार कथासंग्रह आणि सरपंच, इशारा, घुंगरू, कुलवती, बेईमान, ललाटरेषा, सून माझी सावित्री या सात कादंब-या प्रकाशित आहेत. कौल दे खंडेराया आणि सून माझी सावित्री हे चित्रपट त्यांच्या साहित्यकृतींवर निघाले. भल्या घरची मी कामिनी हे लोकनाट्य आणि सून मोठी भाग्याची हे त्यांचे नाटकही गाजले. लोकशिक्षण मासिकाच्या संपादक मंडळावर तसेच महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले.  अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या चिटणीसपदाची जबाबदारीही त्यांनी काही काळ सांभाळली होती. कथाकथनकार म्हणून त्यांची विशेष ख्याची होती.    प्रारंभीच्या काळात प्राथमिक शिक्षक तसेच माध्यमिक शिक्षक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले, परंतु शिक्षकी पेशात त्यांचे मन रमले नाही. अनेक अडचणींवर मात करीत कोल्हापूर येथे पूर्णवेळ लेखक म्हणूनच त्यांनी कारकीर्द घडवली. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या स्थापनेमध्ये पुढाकार असलेल्या प्रमुख व्यक्तिंमध्ये त्यांचा सहभाग होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes