Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळपहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार;  शाळा कृती समिती - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जाहीरठरावधारकांच्या बैठकीत महायुतीमधील पदाधिकाऱ्यांत वादावादी, शपथ घेण्यावरुन  विषय चिघळलाशंकर खंडू पाटील जन्मशताब्दी सरकारतर्फे साजरी होणार, कोल्हापुरात १४ नोव्हेंबरला कार्यक्रमकोल्हापूरचा स्वाभिमान राखण्यासाठी समविचारी आघाडीला  विजयी करा - सतेज पाटीलसेवा संकल्प अभियानातून विद्या मंदिर, भेंडाई धनगरवाडा शाळेला नवे रूपकरवीर तालुका डाग पुसून काढणार, ठरावधारकांचा निर्धार ! महायुतीच्या नेतेमंडळीत आणाभाका ! ! लढा दूध उत्पादकांच्या हितासाठी…दृष्टी गोकुळच्या विकासाची !कोल्हापुरात बुधवारी उद्योग संवाद कार्यक्रमएकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

जाहिरात

 

लढा दूध उत्पादकांच्या हितासाठी…दृष्टी गोकुळच्या विकासाची !

schedule13 Oct 26 person by visibility 116 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर -: संचालिका म्हणून पाच वर्षे काम करत असताना दूध उत्पादक शेतकरी केंद्रस्थानी ठेवला…त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य दिले…कधी प्रशासनानशी संघर्ष केला…तर कधी सर्वसाधारण सभेत आवाज उठवला…विविध पातळीवर आघाडीवर काम करणाऱ्या संचालिका म्हणजे शौमिका महाडिक असे जणू समीकरण बनले. त्यांच्या या धडपडीमागे उद्देश होता, तो दूध उत्पादकांच्या हिताचा आणि दृष्टी होती गोकुळच्या विकासाची…!

गोकुळच्या संचालिका म्हणून त्यांनी गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील विविध भागातील दूध उत्पादकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पशुखाद्य दराचा विषय असो की डिबेंचर्स फरकाचा…प्रत्येक ठिकाणी त्यांची भूमिका ही व्यापक हिताची होती. दूध उत्पादक शेतकरी आणि प्राथमिक दूध संस्थांना न्याय मिळाला पाहिजे या हेतूने त्या कार्यरत होत्या. गोकुळमध्ये संचालिका म्हणून त्या गेल्या पाच वर्षात प्रतिनिधीत्व करताना अभ्यासू संचालिका म्हणून ओळख निर्माण केली. कधी प्रशासनासोबत चर्चा तर कधी आक्रमकपणा या सूत्राचा अवलंब करत त्यांनी विविध विषयांना वाचा फोडली. गोकुळच्या सर्वसाधारण सभेत त्या दूध उत्पादकांच्या आवाज बनल्या. विविध प्रश्न त्यांनी हिरिरीने मांडले. दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले.

आता होत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शौमिका महाडिक या ‘छत्रपती राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी’तून लढत आहेत. महायुती प्रणित या आघाडीत त्या, महिला प्रतिनिधी गटातील उमेदवार आहेत. भाजपच्या धडाडीच्या पदाधिकारी म्हणून त्या सक्रिय आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपद असो की संघटनेच्या महिला आघाडीची जबाबदारी…प्रत्येक ठिकाणी त्यांनी छाप उमटविली. आघाडीच्या पदाधिकारी म्हणून त्या निर्णय प्रक्रियेत असतात.  कोल्हापूरच्या राजकीय, सहकार व सामाजिक क्षेत्रात महाडिक कुटुंबीय अनेक वर्षापासून आघाडीवर काम करणारे. शौमिका महाडिक ही त्याच धडाडीने काम करत आहेत. गोकुळमधील आश्वासक चेहरा म्हणून दूध उत्पादक शेतकरी, ठरावधारक त्यांच्या उमेदवारीला पसंती देत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes