Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळपहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार;  शाळा कृती समिती - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जाहीरठरावधारकांच्या बैठकीत महायुतीमधील पदाधिकाऱ्यांत वादावादी, शपथ घेण्यावरुन  विषय चिघळलाशंकर खंडू पाटील जन्मशताब्दी सरकारतर्फे साजरी होणार, कोल्हापुरात १४ नोव्हेंबरला कार्यक्रमकोल्हापूरचा स्वाभिमान राखण्यासाठी समविचारी आघाडीला  विजयी करा - सतेज पाटीलसेवा संकल्प अभियानातून विद्या मंदिर, भेंडाई धनगरवाडा शाळेला नवे रूपकरवीर तालुका डाग पुसून काढणार, ठरावधारकांचा निर्धार ! महायुतीच्या नेतेमंडळीत आणाभाका ! ! लढा दूध उत्पादकांच्या हितासाठी…दृष्टी गोकुळच्या विकासाची !कोल्हापुरात बुधवारी उद्योग संवाद कार्यक्रमएकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

जाहिरात

 

कोल्हापुरात बुधवारी उद्योग संवाद कार्यक्रम

schedule13 Oct 26 person by visibility 50 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात बुधवारी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी उद्योग संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसूदन हॉल येथे दुपारी १२.१५ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी व व्यावसायिक यांच्या विविध समस्या, अडचणी तसेच उद्योग-व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्याच्या उद्देशाने  या कार्यक्रमामध्ये उद्योजक व व्यापारी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे, तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर विचारविनिमय करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उद्योजक, व्यावसायिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबईचे अध्यक्ष रवींद्र माणगावे व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes