Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळपहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार;  शाळा कृती समिती - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जाहीरठरावधारकांच्या बैठकीत महायुतीमधील पदाधिकाऱ्यांत वादावादी, शपथ घेण्यावरुन  विषय चिघळलाशंकर खंडू पाटील जन्मशताब्दी सरकारतर्फे साजरी होणार, कोल्हापुरात १४ नोव्हेंबरला कार्यक्रमकोल्हापूरचा स्वाभिमान राखण्यासाठी समविचारी आघाडीला  विजयी करा - सतेज पाटीलसेवा संकल्प अभियानातून विद्या मंदिर, भेंडाई धनगरवाडा शाळेला नवे रूपकरवीर तालुका डाग पुसून काढणार, ठरावधारकांचा निर्धार ! महायुतीच्या नेतेमंडळीत आणाभाका ! ! लढा दूध उत्पादकांच्या हितासाठी…दृष्टी गोकुळच्या विकासाची !कोल्हापुरात बुधवारी उद्योग संवाद कार्यक्रमएकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

जाहिरात

 

सेवा संकल्प अभियानातून विद्या मंदिर, भेंडाई धनगरवाडा शाळेला नवे रूप

schedule13 Oct 26 person by visibility 44 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सेवा संकल्प अभियानांतर्गत पन्हाळा तालुक्यातील विद्या मंदिर, भेंडाई धनगरवाडा या शाळेचे रंगकाम २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुंदर आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कामासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांनी उत्स्फूर्त सहकार्य केले.

शाळेच्या रंगकामासाठी शिक्षणसेवक राजीव कामत यांनी व्हॉट्सॲप स्टेट्सद्वारे केलेल्या आवाहनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्याध्यापक संतोष चौगुले यांच्या सहकार्याने दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी अवघ्या दोन दिवसांत जवळपास ४० हजार रुपयांचा निधी उभारला. अवघ्या दोन दिवसांत जमा झालेल्या या निधीमुळे शाळेच्या रंगकामाचे काम मार्गी लागले असून, शाळेच्या उन्नतीसाठी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि दानशूर व्यक्तींनी दाखविलेला पुढाकार विशेष कौतुकास्पद ठरला आहे. या उपक्रमाला पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर, गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर आणि केंद्रप्रमुख विनोद पोवार यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत करणाऱ्या तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती, माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes