Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळपहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार;  शाळा कृती समिती - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जाहीरठरावधारकांच्या बैठकीत महायुतीमधील पदाधिकाऱ्यांत वादावादी, शपथ घेण्यावरुन  विषय चिघळलाशंकर खंडू पाटील जन्मशताब्दी सरकारतर्फे साजरी होणार, कोल्हापुरात १४ नोव्हेंबरला कार्यक्रमकोल्हापूरचा स्वाभिमान राखण्यासाठी समविचारी आघाडीला  विजयी करा - सतेज पाटीलसेवा संकल्प अभियानातून विद्या मंदिर, भेंडाई धनगरवाडा शाळेला नवे रूपकरवीर तालुका डाग पुसून काढणार, ठरावधारकांचा निर्धार ! महायुतीच्या नेतेमंडळीत आणाभाका ! ! लढा दूध उत्पादकांच्या हितासाठी…दृष्टी गोकुळच्या विकासाची !कोल्हापुरात बुधवारी उद्योग संवाद कार्यक्रमएकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

जाहिरात

 

ठरावधारकांच्या बैठकीत महायुतीमधील पदाधिकाऱ्यांत वादावादी, शपथ घेण्यावरुन  विषय चिघळला

schedule13 Oct 26 person by visibility 35 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :- गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी शपथ घेण्यावरून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमधील मतभिन्नता करवीर तालुक्यातील  ठरावधारकांच्या बैठकीत समोर आली. शपथ कुठे घ्यायची यावर नेत्यांमध्ये एकमत होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या ठरावधारकांनी “तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?, शपथ घेणारच नाही” असा पवित्रा घेत थेट बैठकीतूनच बाहेर पडणे पसंद केल्याचे वृत्त आहे.  संकल्पसिद्धी हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महायुतीचे नेतेमंडळीसह उमेदवार उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत माजी चेअरमन नावेद मुश्रीफ यांनी आपली भूमिका मांडताना ठरावधारकांची शपथ ही सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या मंदिरात जाऊनच घेतली पाहिजे अशी भूमिका मांडली. तर याउलट प्रयाग चिखली येथील रघु पाटील यांनी संकल्प सिद्धी हॉलमध्येच सर्व ठरावधारकांची शपथ उरकून घ्यावी, अशी भूमिका घेतली. माजी संचालक बाळासाहेब खाडे यांनीही याला पाठिंबा देत,आमचे ठरावधारक इथेच शपथ घेतील असे ठामपणे सांगितले. दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका ताणुन धरल्यामुळे त्या तिघांमध्ये काही काळ जोरदार वादावादी झाली. नेत्यांमधील हा वाद वाढल्याने हॉलमध्ये बैठकीच्या ठिकाणी एकच गोंधळ निर्माण झाला.वातावरण तापल्यामुळे अखेर आयोजित बैठक पूर्ण होऊ शकली नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes