Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळपहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार;  शाळा कृती समिती - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जाहीरठरावधारकांच्या बैठकीत महायुतीमधील पदाधिकाऱ्यांत वादावादी, शपथ घेण्यावरुन  विषय चिघळलाशंकर खंडू पाटील जन्मशताब्दी सरकारतर्फे साजरी होणार, कोल्हापुरात १४ नोव्हेंबरला कार्यक्रमकोल्हापूरचा स्वाभिमान राखण्यासाठी समविचारी आघाडीला  विजयी करा - सतेज पाटीलसेवा संकल्प अभियानातून विद्या मंदिर, भेंडाई धनगरवाडा शाळेला नवे रूपकरवीर तालुका डाग पुसून काढणार, ठरावधारकांचा निर्धार ! महायुतीच्या नेतेमंडळीत आणाभाका ! ! लढा दूध उत्पादकांच्या हितासाठी…दृष्टी गोकुळच्या विकासाची !कोल्हापुरात बुधवारी उद्योग संवाद कार्यक्रमएकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

जाहिरात

 

साहित्य, अभिनय अन् नृत्यात शहीदच्या विद्यार्थिनींचा डंका ! एसएनडीटी युवा महोत्सवात साहित्य विभागात यश !

schedule13 Oct 26 person by visibility 128 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या युवा महोत्सवात शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. साहित्य, नाट्य आणि लोकनृत्य अशा विविध कलाप्रकारांत विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
      या महोत्सवात महाविद्यालयाने साहित्य विभागात उपविजेतेपद पटकावले. साहित्य प्रकारात इंग्रजी वादविवाद आणि मराठी निबंध स्पर्धेत  अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक, मराठी कविता स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविण्यात विद्यार्थ्यांना यश आले.   नाट्य विभागात पथनाट्य आणि मिमिक्री या प्रकारांत प्रथम क्रमांक मिळाला तर  मूकाभिनय या प्रकारांत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. तसेच लोकनृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची छाप पाडली.महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी यश संपादन केल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.   
           विद्यार्थीनींना शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील,शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, उपप्राचार्य सागर शेटगे,प्रशिक्षक युवराज डावरे, रोहित पाटील , विनायक पाटील प्रा.दिग्विजय कुंभार , प्रा. अविनाश पालकर  आदींचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes