Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेची  कर्ज मर्यादा ५५ लाख - चेअरमन साताप्पा कासारकामगार नेते कॉम्रेड बाबा यादव यांचे निधनविवेकानंद कॉलेजमध्ये   सदानंद  दुर्गुळे यांचा सेवागौरव सोहळा विवाहातील आहेरची रक्कम अंधशाळेला भेट, वाझे परिवाराचा स्तुत्य उपक्रमपदोन्नती प्रक्रियेला ब्रेक ! पदाधिकारी -अधिकारी - शिक्षक संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक !!केआयटीचा प्लेसमेंटमध्ये नवा इतिहास ! १५७ कंपन्यांकडून ६५२ विद्यार्थ्यांची  निवड !! जज डडसांगलीत शिक्षकांच्या आंदोलनाला प्रतिसाद, बहुसंख्य शाळा बंदकोल्हापूरात चार ऑगस्टला राज्यव्यापी परिषद, बाजार समितीच्या सेस विरोधात आंदोलनाची दिशा ठरणारचुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षकांचा हल्लाबोल, सरकार- प्रशासनाविरोधात उमटला रोष

जाहिरात

 

विवेकानंद कॉलेजमध्ये   सदानंद  दुर्गुळे यांचा सेवागौरव सोहळा

schedule11 Jul 26 person by visibility 70 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,: विवेकानंद कॉलेजमधील प्रयोगशाळा सहाय्यक  सदानंद हिंदुराव दुर्गुळे हे ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा कॉलेजतर्फे सेवागौरव समारंभ आयोजित केला होता.  प्रशासकीय प्रतिनिधी  हितेंद्र साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. निष्ठावान सेवक म्हणून एम.आर.पाटील यांचे नंतर एकाच शाखेवर नोकरी पूर्ण होऊन त्याचठिकाणी सेवानिवृत्त होणारे म्हणजे सदानंद दुर्गुळे होय. कॉलेज व संस्था कामासाठी कधीही बोलावल्यास हजर राहणारे असे दुर्गुळे यांचे व्यक्तिमत्व असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनंतर श्री.दुर्गुळे यांचा परिचय सर्वांना करुन देऊन उपस्थितांचे स्वागत केले. ग्रंथपाल डॉ.नीता पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  गावडे यांच्या हस्ते दुर्गुळे यांचा सपत्नीक पुष्पगुच्छ, श्रीफळ, पोशाख, मानपत्र व गौरवचिन्ह देऊन सत्कार करणेत आला. संस्थेचे सीईओ गावडे यांनी संस्थेच्यावतीने त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

       ज्युनियर कॉलेजकडील प्रा.विश्वंभर कुलकर्णी, डॉ.कविता तिवडे, निवृत्त सेवक  भरत कवठेकर, माजी जिमखानाप्रमुख प्रा.किरण पाटील, प्रियंका बीडकर, बी.व्होक.विभागाकडील प्रयोगशाळा सहाय्यक अमित साळुंखे, प्रा.एस.टी.शिंदे, माजी अकौंटंट एम.आर.पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या. दुर्गुळे यांनी सत्कारास उत्तर देताना, या संस्थेमुळे मी घडलो, मला कौटुंबिक स्थैर्य मिळाले. संस्थेने मला एकाच शाखेवर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल ऋण व्यक्त केले. प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांनी हा क्षण अतिशय भावनीक असल्याचे नमूद केले. सेवा कशी करावी याचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणून दुर्गुळे यांचेकडे पाहता येईल असे सांगितले.  प्रा.डॉ.सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes