Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी मुख्यमंत्री सांगतील तसे महायुतीचे पॅनेल – मंत्री हसन मुश्रीफपदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता - गैरप्रकारची चौकशी होणार - मंत्री हसन मुश्रीफजिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग हा जिल्ह्याचा आत्मा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर महापालिकेतील समित्यांच्या सभापती उपसभापती निवडीतही रंगले नाट्य ! समान मतामुळे क्रीडा समिती पदाधिकारी निकाल चिठ्ठीद्वारे ! !उपाध्यक्षांनी पॉवर टिलर चालवत केली चिखलणी, शेतकऱ्यांसोबत लुटला झुणका भाकरीचा आस्वाददूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशास मुदतवाढएक दिवस बळीराजासाठी, पालकमंत्र्यांनी केली भात रोप लावण ! वृक्षारोपणाचा  कृतिशील धडा, बोरपाडळेतील खडके अॅकेडमीचा पर्यावरणवादी उपक्रमप्राचार्य व्ही. एम. पाटील यांचा जीवनप्रवास म्हणजे संघर्षातून घडलेला यशाचा दीपस्तंभकोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान चार वर्षात उभारणार, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मैदानाचा करार

जाहिरात

 

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेची  कर्ज मर्यादा ५५ लाख - चेअरमन साताप्पा कासार

schedule12 Jul 26 person by visibility 97 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर: सभासदांना ५५ लाख रुपये  इतकी कर्जमर्यादा केल्याची घोषणा कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन साताप्पा कासार यांनी केली .  पतसंस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम सोसायटी हॉल कसबा बावडा  झाली. संस्थापक व तज्ञ संचालक भरत रसाळे यांच्या हस्ते जलर्पण करून सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत या सभेची सुरवात झाली . याप्रसंगी चेअरमन कासार यांनी कर्जमर्यादेत वाढ केल्याचे घोषित केले.
 चेअरमन कासार म्हणाले, ‘चालू वर्षी आपल्या संस्थेस विक्रम तीन कोटी ६५ लाख ७९ हजार ३३७  रुपये इतका नफा झाला आहे.इतका विक्रमी नफा झाला. त्यातून सभासदांना पंधरा टक्के
  लाभांश व भेट म्हणून  शेअर भांडवलावर तीस टक्के रक्कम अशी एकूण ४५ टक्के सभासद भेट मिळणार आहे  त्याचबरोबर सभासदांना दिवाळी भेटही दिली जाणार आहे . संस्थेची वार्षिक  उलाढाल ६५० कोटीवर असून संस्थेकडील ठेवी ११२ कोटीच्या पुढे आहेत. पतसंस्थेचे संस्थापक व तज्ञ संचालक रसाळे यांनी लाभांश व कायम ठेवीवरील व्याज तात्काळ सभासदांच्या सेव्हिंग खात्यावर जमा केले जाणार असून संस्थेने स्विकारलेल्या सहकार खात्याच्या नवीन उपविधी नुसार   सभासदांनी आपले सर्व व्यवहार चोख ठेवावेत असे आवाहन केले .
चर्चेत संचालक राजेंद्र कोरे, शिवाजी सोनाळकर, सभासद सागर पाटील, टी आर पाटील, कुमार पाटील, दत्तात्रय पाटील, संतोष केसरकर यांनी सहभाग घेतला.
  नोटीस वाचन सचिव वसंत पाटील यांनी केले. प्रोसिडिंग वाचन व्यवस्थापक सदाशिव साळवी यांनी केले. विद्या पाटील यांनी सूत्रंचालन केले. व्हाइस चेअरमन अमित परीट यांनी आभार मानले. सभेला संचालक मच्छिंद्र नाळे, कृष्णात चौगले, सर्जेराव नाईक, माधुरी घाटगे ,राजेश कोंडेकर, महादेव डावरे, रोहिणी येडगे, संतोष आयरे सल्लागार समिती सदस्य आप्पासो वागरे,  पंडित मस्कर ,चंद्रकांत वाकरेकर,  दशरथ कांबळे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes