Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज डडसांगलीत शिक्षकांच्या आंदोलनाला प्रतिसाद, बहुसंख्य शाळा बंदकोल्हापूरात चार ऑगस्टला राज्यव्यापी परिषद, बाजार समितीच्या सेस विरोधात आंदोलनाची दिशा ठरणारचुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षकांचा हल्लाबोल, सरकार- प्रशासनाविरोधात उमटला रोषजिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहायकावर कारवाईची मागणीतीन महिन्यात तीन अध्यक्ष, गोकुळच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी प्रदीप मालगावेसंस्थेच्या नावांनी बनावट नियुक्ती आदेश, चार शिक्षिकांसह लिपिकाविरोधात पोलिसात गुन्हाविवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. मिलिंद हुजरेराज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून कोरे डिप्लोमाला अतिशय उत्कृष्ट मानांकनगोकुळ जपू या - गोकुळ वाढवू या, डॉ. युवराज येंडुरेंच्या नेतृत्वाखालील आत्मक्लेश आंदोलनात शेतकरीही सहभागी 

जाहिरात

 

सांगलीत शिक्षकांच्या आंदोलनाला प्रतिसाद, बहुसंख्य शाळा बंद

schedule09 Jul 26 person by visibility 35 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात सांगली जिल्ह्यातील २४ शिक्षक संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शिक्षकांनी सामूहिक रजा काढून आंदोलनात सहभाग घेतला. यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शाळा बंद राहिल्या.

टीईटीची सक्ती करू नये, बीएलओचे काम बंधनकारक असू नये, अशैक्षणिक कामे बंद करावीत यासह विविध मागण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनात हजारो शिक्षकांचा सहभाग होता. शिक्षकांना फक्त शिकवू द्या अशा पद्धतीची मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे यांनी केली. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी प्रास्ताविक आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली.  डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी आंदोलनाला भेट देऊन सरकार, शिक्षकांच्या विरोधात काम करत असून मराठी शाळा बंद पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप केला.

शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायकारक धोरणा विरोधात वाचा फोडली, जिल्हाध्यक्ष शशिकांत बजबळे यांनी टीईटी शिक्षकांना का नको याविषयी आपले मत मांडले. जुन्या पेन्शनचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी १९८२ ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यांवर भूमिका मांडली. शिक्षक परिषदेचे राजेंद्र नागरगोजे यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रश्नावर भूमिका मांडली. प्राथमिक शिक्षक संघाचे माधवराव पाटील, धैर्यशील पाटील, शिक्षक परिषदेचे शशिकांत पाटील, प्रहार संघटनेचे चंद्रशेखर क्षीरसागर, माध्यमिक शिक्षक भारतीचे सुधाकर माने, मुख्याध्यापक संघाचे संतोष नाईक,कास्ट्राईब संघटनेचे परशुराम जाधव, बापू दाभाडे, सागर खाडे, सुनिता चौगुले,करुणा मोहिते, अर्चना कोळेकर, अंजली कमाने यांनी मनोगत व्यक्त केले. धरणे आंदोलनानंतर शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महेश शरनाथे, अमोल माने, शशिकांत बजबळे, राजेंद्र नागरगोजे, अमोल शिंदे, सयाजी पाटील, धैर्यशील पाटील, माधवराव पाटील, मुकुंद सूर्यवंशी, परशुराम जाधव, शशिकांत पाटील, चंद्रशेखर क्षीरसागर, संतोष काटे, मुरलीधर दोडके, उत्तम इंगळे, बाबासाहेब जानकर, राजेंद्र कांबळे, मनोहर साबळे, डॉ. संतोष कदम, भानुदास चव्हाण, रमेश पेटकर, जकी पटेल, अन्सार तांबोळी, अजय राक्षे,  सदाशिव वारे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes