Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेची  कर्ज मर्यादा ५५ लाख - चेअरमन साताप्पा कासारकामगार नेते कॉम्रेड बाबा यादव यांचे निधनविवेकानंद कॉलेजमध्ये   सदानंद  दुर्गुळे यांचा सेवागौरव सोहळा विवाहातील आहेरची रक्कम अंधशाळेला भेट, वाझे परिवाराचा स्तुत्य उपक्रमपदोन्नती प्रक्रियेला ब्रेक ! पदाधिकारी -अधिकारी - शिक्षक संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक !!केआयटीचा प्लेसमेंटमध्ये नवा इतिहास ! १५७ कंपन्यांकडून ६५२ विद्यार्थ्यांची  निवड !! जज डडसांगलीत शिक्षकांच्या आंदोलनाला प्रतिसाद, बहुसंख्य शाळा बंदकोल्हापूरात चार ऑगस्टला राज्यव्यापी परिषद, बाजार समितीच्या सेस विरोधात आंदोलनाची दिशा ठरणारचुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षकांचा हल्लाबोल, सरकार- प्रशासनाविरोधात उमटला रोष

जाहिरात

 

विवाहातील आहेरची रक्कम अंधशाळेला भेट, वाझे परिवाराचा स्तुत्य उपक्रम

schedule11 Jul 26 person by visibility 117 categoryसामाजिक

 

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विवाह समारंभातील आहेर, भेटवस्तू आणि पाकिटे स्वीकारण्याऐवजी ती रक्कम अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवत वाझे परिवाराने राबविला. आहेराच्या माध्यमातून जमा झालेली सव्वा लाख रुपयांची मदत ज्ञान प्रबोधन संचलित अंधशाळेला सुपूर्द करण्यात आली.
कोल्हापुरातील सुधर्म हिंदुराव वाझे यांचे सुपुत्र सिद्धार्थ यांचा विवाह
 रक्षता खटावकर यांच्याशी नुकताच झाला. विवाहानिमित्त नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतकांना आहेर, भेटवस्तू किंवा पाकिटे न देता अंधशाळेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे विवाहानंतरही जवळपास सहा महिने मदतीचा ओघ कायम राहिल्याने सव्वा लाख रुपयांचा निधी जमा झाला.
ज्ञान प्रबोधन संचलित अंधशाळा अनेक वर्षांपासून उपेक्षित अंध विद्यार्थ्यांना शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या जडणघडणीत दिवंगत हिंदुराव वाझे यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या समाजसेवेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याचे सुधर्म वाझे यांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर अक्षय जरग, शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास, कोल्हापूर प्रेस क्लबचे शितल धनवडे ,काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेवक अश्किन आजरेकर, नगरसेविका दीपा अजित ठाणेकर, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, बाबा महाडिक, उद्योगपती अभय देशपांडे,  राजाराम कारखान्याचे माजीअध्यक्ष दिलीप पाटील, हदयस्पर्शचे पद्माकर कापसे, प्रा. किरण पाटील, दत्ताजीराव वाझे, हरिभाऊ वाझे, राजीव जामसांडेकर, डॉ. संदीप पाटील,  यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले.  सोमनाथ नलावडे यांनी सूत्रसंचालन केले.  डॉ. सुहास बोन्द्रे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes