गार्डन्स क्लब कोल्हापूरतर्फे सहा संस्थांना बीज राखीचे प्रशिक्षण
schedule09 Aug 25 person by visibility 83 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पर्यावरण व वातावरण बदलाचा जास्तीत जास्त सामना ज्या पुढच्या पिढीला करावा लागणार आहे ,त्यांना लहान पणा पासूनच छोट्या छोट्या कृतीतून हि या बदलला आणि ऱ्हासाला आवर घालण्यासाठी आपण आपला वाटा उचलू शकतो हे क्लब च्या सेव अवर सीड्सच्या टीम ने दाखवून दिले.
पर्यावरणपूरक सण ही संकल्पना क्लब तर्फे गेले कित्येक वर्षे राबवली जात आहे आणि याचाच एक भाग म्हणून 'बीज राखी ' ची कल्पना उदयास आली आणि क्लब ची पंधरा जणांची टीम यासाठी कामाला लागली. राखीसाठीचे सर्व विघटन होऊ शकणारे सामान, लगेच रुजणाऱ्या बिया, बेस पेपर , गोंद यावर अनेक प्रयोग करून किट बनवण्यात आल्या. उद्योगिनी संस्था, राधाबाई शिंदे शाळा, रोटाकिड्स, टेरियर शाळा , न्यू मॉडेल शाळा , शाहू विद्यालय अशा एकूण सहा ठिकाणी यशस्वी रीतीने कार्यशाळा घेऊन साधारण ६०० शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक बीज राखी चे धडे दिले. या व्यतिरिक्त काही सभासदांनी पण या किट्स घेऊन त्याचा प्रचार आणि प्रसार केला. समन्वयक वर्षा वायचळ , सल्लागार डॉ रचना संपतकुमार, अभय कोटणीस, सुषमा शेवडे, चारुता शिंदे , अंजना पाटील , निशिगंधा कुलकर्णी , दीपा भिंगार्डे , मयूरा पाटील , रोहिणी पाटील, शैला निकम, चित्रा देशपांडे, रेणुका वाधवानी, रीना गरगटे उपस्थित होते. कार्यक्रमांचे संयोजन क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी केले. सचिव सुप्रिया भस्मे, कोषाध्यक्ष प्राजक्ता चरणे आदींनी परीश्रम घेतले.