सतेज पाटलांचा वाढदिवस होणार लोकोत्सव, दहा लाख वह्या संकलनाचे उद्दिष्ट
schedule06 Apr 26 person by visibility 46 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा १२ एप्रिलला होणारा वाढदिवस विविध उपक्रम राबवून लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा संकल्प सोमवारी, ( सहा एप्रिल २०२६) कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट ठेवले आहे. आमदार पाटील यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीत कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
यामध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृद्धाश्रम फळे वाटप, विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीसाठी विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अपंग, निराधार मुलांना अल्पोपहार, गुणवंत कामगार संघटनेमार्फत काव्य संमेलनाचे आयोजन, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये वृक्षारोपण, फुटबॉल, करवीर सतेज चषक स्पर्धा, लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा तसेच तालुका स्तरावरही विविध सामाजिक उपक्रम राबण्यात येणार आहेत. यंदाही कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांच्या माध्यमातून आमदार पाटील यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त ५४ हजार वह्या देण्याचा संकल्प महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू लाटकर यांनी केला.
जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या १५ सदस्यांच्या माध्यमातून ५४ हजार वह्या भेट देण्याचा संकल्प जाहीर केला. युवराज गवळी यांनी गवळी समाजाच्या माध्यमातून ११ हजार वह्या भेट देत पाचगावमध्ये म्हैस शर्यत स्पर्धा आयोजित करणार असल्याचे सांगितले. यंदा दहा लाख वह्यांचे उदिष्ठ ठेवल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सांगितले. तसेच युथ काँग्रेसच्या माध्यमातून २५ हजार वह्या देण्याचे त्यांनी जाहीर केले.आमदार पाटील हे वाढदिनी दुपारी ४ नंतर कसबा बावड्यातील त्यांच्या यशवंत निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
या बैठकीला आमदार जयंत आसगावकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा परिषद काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते राजू लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, गोकुळचे संचालक चेतन नरके, संचालक बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तायशेटे, शशिकांत खोत, माजी नगरसेवक भूपाल शेटे, भारती पोवार, तौफिक मुल्लानी, युवराज गवळी, बाळासाहेब सरनाईक, अक्षय शेळके, भरत रसाळे, संपतराव पाटील, संजय पोवार - वाईकर, मंगल खुडे, सरला पाटील, उज्ज्वला चौगले, हेमा पाटील, नगरसेवक संजय मोहिते, प्रवीण केसरकर, अर्जुन माने, दुर्वास कदम अमर समर्थ, सुभाष बुचडे, विनायक कारंडे, अजित पोवार, सचिन चौगले, संतोष जरग, दिपाली घाटगे उपस्थित होते.