Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एकाच विषयावर फोकस नाही, ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास हाच अजेंडा - सीईओ डॉ. जस्मिनसतेज पाटलांचा वाढदिवस होणार लोकोत्सव, दहा लाख वह्या संकलनाचे उद्दिष्ट पदोन्नतीच्या फरकाची रक्कम जमा, प्राध्यापक महासंघातर्फे अधिकाऱ्यांचा सत्कारभाजपाचा वर्धापनदिन, सिनीअर कार्यकर्त्यांचा सन्मान अन् २०२९ च्या निवडणुकीसाठी तयारीचे आवाहनकार डीलर्स असोसिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धा, सोळा संघाचा सहभागयुवा ग्रामीण पतसंस्थेस ४६ लाखाचा नफा – चेअरमन अर्जुन आबिटकरभगवान महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी नवकार महामंत्र पठण अक्कमहादेवी पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात, सुजाता विभूते, संगीता करंबळी सन्मानितवैद्यकीय अधिकारी सक्तीच्या रजेवरबसव केंद्रातर्फे चित्रदुर्ग मठात मासिक अनुभव मंटप कार्यक्रम उत्साहात

जाहिरात

 

एकाच विषयावर फोकस नाही, ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास हाच अजेंडा - सीईओ डॉ. जस्मिन

schedule06 Apr 26 person by visibility 345 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘माईंड सेट करुन एखाद्या विषयावर फोकस करण्यापेक्षा, येत्या महिनाभरात जिल्हा समजून घेऊ. विविध कामांचा आढावा घेऊ. संपूर्ण जिल्हयाच्या विशेषत ग्रामीण भागाच्या विकासाच्या अजेंडयावर कामाला प्राधान्यक्रम राहील.’अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हसरत जस्मिन यांनी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची सोलापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. त्यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपद डॉ. जस्मिन यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. जस्मिन या मूळच्या दिल्ली येथील आहेत. रत्नागिरी येथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांची सीईओ म्हणून कोल्हापुरात बदली झाली. त्यांनी, सोमवारी सहा एप्रिल २०२६ मुख्य कार्यकारी अधिकारपदाचा पदभार स्वीकारला.तत्पूर्वी, त्यांनी सकाळी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. सायंकाळी, पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाले, ‘कोल्हापूर हा जिल्हा संवेदनशील, जागरुक व प्रगत  जिल्हा आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना यशस्वी राबविल्या आहेत. ज्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहेत, लोकोपयोगी आहेत त्या योजना तितक्याच प्रभावीपणे पुढेही चालू राहतील.’

‘गतीमान आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्यावर भर राहील. कोल्हापुरात बारा तालुके आहेत. पूर्वी मी फक्त दोन तालुक्याचे काम पाहत होते. कोल्हापुरात काम करणे माझ्यासाठी आनंददायी आणि अनुभवात भर घालणारे आहे. ग्रामीण भागात सरकारच्या विविध योजना पोहोचविण्यावर लक्ष राहील. तालुका आणि ग्रामपंचायतस्तरावर लोकांशी निगडीत प्रश्नांची सोडवणूक झाली तर, त्यांना जिल्हा परिषदेपर्यंत धाव घ्यावी लागणार नाही. त्यादृष्टीने आपण काम करणार आहोत.कोल्हापुरात काम करण्यासाठी प्रचंड वाव आहे. त्यामुळे एकाच विषयावर फोकस करण्यापेक्षा, येत्या महिनाभरात संपूर्ण जिल्हा समजून घेऊ. आढावा बैठकीतून माहिती घेऊ. ग्रामीण भागाला न्याय, शेवटच्या घटकापर्यत सरकारी योजना पोहोचविणे या गोष्टींना प्राधान्य राहील.’ पत्रकार परिषदेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes