वैद्यकीय अधिकारी सक्तीच्या रजेवर
schedule05 Apr 26 person by visibility 155 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर शिवाजी टोणपे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. टोणपे हे दारूच्या नशेत ऑफिसमध्ये आढळले. वैद्यकीय अधिकारी ऑफिसमध्ये बेसिस्तपणे वागत असल्याने समाज माध्यमात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकाराची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली. या साऱ्या प्रकाराची गंभीर दाखल घेत कोल्हापूर मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी वैद्यकीय अधिकारी टोणपे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.