Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसक्तीच्या टीईटी परीक्षेतून सवलत मिळण्यासाठी खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार - खासदार धैर्यशील मानेआरोग्य विभागात साफसफाई ! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, सुप्रिया देशमुख निलंबित !!महामानवाच्या द्विजन्मशताब्दीचा सरकारला विसर ! क्रांतिबा जोतिबांचा वापर राज्यकर्त्यांकडून केवळ भाषणापुरताच ! !अशक्य ते शक्य करतात मुश्रीफ ! रामायणात दहा तोंडाचा रावण, बाजार समितीत अठरा तोंडाची रावणं !!कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी नानासो कांबळे-साकेकरसेवक संघाचे ठिय्या आंदोलन, प्रशासनाने घेतला पदोन्नतीचा निर्णयबाजार समितीत पदाधिकारी बदलाचे राजकारण दमदार ! सभापती - संचालक मंडळाची कामगिरी मात्र सुमार !!अंजू तुरंबेकर देणार भूतानच्या महिला फुटबॉलपटूना प्रशिक्षणश्रीराम पचिंद्रे यांच्या शाहू कादंबरीतील पाठ शालेय अभ्यासक्रमात

जाहिरात

 

बसव केंद्रातर्फे चित्रदुर्ग मठात मासिक अनुभव मंटप कार्यक्रम उत्साहात

schedule05 Apr 26 person by visibility 285 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बसव केंद्र, कोल्हापूर लिंगायत समाज संस्था आणि राणी चन्नमा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा चौक येथील चित्रदुर्ग मठ येथे मासिक अनुभव मंटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कौन्सिल ऑफ एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा रजनी मगदूम यांच्या हस्ते जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
 याप्रसंगी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत, जिल्हा परिषद सदस्य शैलजा सतीश पाटील, महेश पाटील, हातकणंगले पंचायत समिती सदस्य प्रियांका खोबरे, गडहिंग्लज  पंचायत समिती सदस्य सारिका संजय बटकडली यांचा सत्कार करण्यात आला.
 याप्रसंगी संध्या प्रमोद व्हनगुते यांनी, "महात्मा बसवेश्वर : विचार व कार्य " याविषयी मनोगत व्यक्त केले. 'महात्मा बसवेश्वर यांनी  समाजातील सर्व घटकांना न्याय दिला.  महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांची रुजूवत केली. समता, समानतेची शिकवण दिली. "
 बसव केंद्राच्या विश्वस्त सरला पाटील यांनी स्वागत केले. याप्रसंगे डॉ. विश्वनाथ मगदूम,  प्राचार्य जी. पी. माळी, शरण साहित्य अध्यासन केंद्राच्या समन्वयक तृप्ती करेकट्टी, बसव केंद्राचे विलास आंबोळे, बाबुराव तारळी, चंद्रशेखर बटकडली, रमेश बोधले, विलास पटकुरे, वैजयंती पाटील,  सुरेश जांभोरे, द्राक्षायणी नाईकवडी, पार्वती माळी आदी उपस्थित होते. राजशेखर तंबाखे यांनी आभार मानले. लिंगायत फॅमिली भिशी साने गुरुजी वसाहततर्फे दासोहीचे आयोजन केले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes