गोकुळमध्ये शिट्टी वाजली, सतेज पाटील सत्तेच्या दिशेने ! महायुतीला झटका!!
schedule19 Oct 26 person by visibility 1658 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीला एकापासून एक धक्के बसत आहेत तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीने सत्तेच्या दिशेने मुसंडी मारताना दिसत आहे. सर्वसाधारण गटातील 20 जागांपैकी ११ जागा महायुतीला तर नऊ जागेवर सतेज पाटील गटाच्या उमेदवार आघाडीवर आहेत. तर राखीव गटातील पाच जागांमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील उमेदवार हे आघाडीवर आहेत. शौमिका महाडिक यांची झुंज सुरू आहे. गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील अरुण डोंगळे नवीद मुश्रीफ हे सगळे पिछाडीवर आहेत. गोकुळ दूध संघाची निवडणूक यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट झाली होती 25 जागांसाठी पन्नास उमेदवार रिंगणात होते. यंदा ही निवडणूक दोन्ही आघाड्यांनी प्रतिष्ठेची केली होती.