Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मोठ-मोठे गार झाले गोकुळमध्ये, सतेज पाटलांनी जिंकली निवडणूक ! महायुतीच्या बडया नेत्यांसह वारसदारांनाही झटका !!गोकुळमध्ये शिट्टी वाजली, सतेज पाटील सत्तेच्या दिशेने ! महायुतीला झटका!!तिसऱ्या फेरीअखेर महायुतीचे 14 उमेदवार आघाडीवर, समविचारीचे सहा उमेदवारांची मुसंडीगोकुळमध्ये काटे की टक्कर, 825 मतांची मोजणी पूर्णशिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढायला सदैव पुढे - आमदार जयंत आसगावकरगोकुळसाठी चुरशीने ९९.९६ टक्के मतदान, दहा तालुक्यात शंभर टक्के मतदानअनुवादक हा भाषा -संस्कृतीमधील नाविक, वर्षा गगराणींची साहित्यिक कामगिरी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदविली जाईल : डॉ. दामोदर खडसेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापुरात, शिक्षक – पदवीधर निवडणूक प्रचारार्थ मेळावाशिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार!  शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेवर्षा गगराणी अनुवादित चौदा पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळा

जाहिरात

 

शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढायला सदैव पुढे - आमदार जयंत आसगावकर

schedule19 Oct 26 person by visibility 52 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शिक्षकांचे प्रश्न आणि शैक्षणिक समस्या निश्चितपणे प्राधान्याने सोडवल्या जातील, गेली सहा वर्षे आमदार म्हणून काम करत असताना शिक्षक हिताला प्राधान्य दिले. यापुढेही शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढताना कधीही मागे हटणार नाही ’अशी वाही पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांनी दिली.

पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, एस. एम. लोहिया हायस्कूल, न्यू हायस्कूल आणि न्यू इंग्लिश मीडियम स्कूलला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया, उपाध्यक्ष नितीन वाडेकर, सचिव प्रभाकर हेरवाडे, सहसचिव एस. एस. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

 याप्रसंगी आमदार आसगावकर यांनी गेल्या सहा वर्षात आमदार म्हणून केलेल्या कामाचा ऊहापोह केला. राज्यातील शिक्षकांच्या टप्पा अनुदान वाढीसाठी सातत्याने पाठपुरावा करून शिक्षक बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रामाणिक लढा दिला. पहिल्या टप्प्यापासून ते आतापर्यंत शिक्षकांच्या टप्पा अनुदानाच्या बाबतीत प्रत्येक टप्प्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. विधिमंडळात आवाज उठवला, अभ्यासपूर्ण अहवाल सादर करत तीन टप्प्यांचा प्रश्न मार्गी देखील लावला. शिक्षकांना तीन टप्पे मिळाले देखील. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या कार्यपद्धतीनुसार गेल्या सहा वर्षात काम करण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षकांचा वैयक्तिक प्रश्न असो की  संस्थेचा प्रश्न प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा  केला.’असे त्यांनी सांगितले.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes