साई मंदिर परिवारतर्फे २५ एप्रिलला मंत्री-आमदारांचा सत्कार, आरोग्य सप्ताहाचे आयोजन
schedule23 Apr 25 person by visibility 111 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : रविवार पेठेतील साई मंदिर परिवारतर्फे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच महिला आरोग्य सप्ताहाचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला आहे अशी मााहिती संयोजक डॉ. महेंद्र फाळके यांनी दिली. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता अक्कमहादेवी मंटप येथे कार्यक्रम होणार आहे.
या सत्कार सोहळ्यास डॉ. सतीश पत्की, आरोग्य उपसंचालक दिलीप माने, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ .अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांची उपस्थिती आहे. दरम्यान या सत्कार सोहळयाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून महिलांनी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे होणाऱ्या आरोग्य शिबिरासाठी नाव नोंदणी करून टोकन क्रमांक घ्यावा.
साई मंदिर परिवाराच्या पुढाकारातून २६ एप्रिल ते तीन मे २०२५ या कालावधीत महिलांसाठी आरोग्य शिबिर सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे होणार आहे. सावित्रीबाई फुले हॉस्पीटल येथे सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत मोफत आरोग्य शिबीर होणार आहे. यामध्ये तज्ञ डॉकटर आरोग्य तपासणी, उपचार मोफत तसेच औषध शस्त्रक्रियेही मोफत केल्या जाणार आहेत. सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील, तसेच कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथील डॉ. रेश्मा पवार या प्रसंगी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्ते पद्माकर कापसे, अनिल धडाम आदी उपस्थित होते.