Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
‘स्वमन सामाजिक’तर्फे कोल्हापुरात मानवाधिकारसंबंधी जनजागृतीप्रॅक्टिस फुटबॉल क्लबतर्फे बुधवारी आजी – माजी फुटबॉलपटूंचा सत्कारसतेज पाटलांचा प्रचाराचा धडाका, महायुतीचे नेते अडकले जागा वाटपाच्या चक्रात !!जिल्हाधिकाऱ्यांनी केली दुष्काळी जत तालुक्यातील गावांची पाहणीअभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ जाहीरवन्यजीव सप्ताह निमित्त खडके अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून  सन्मानएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी प्रा .विलास  नांदवडेकर  ग्रामीण भागांशी जोडलेलं, अनुभवी नेतृत्व ! रामचंद्र भोगमांची उमेदवारी दूध उत्पादकांना वाटतेय आपली !!मराठी अध्यापक संघातर्फे दोन दिवसीय शिक्षक साहित्य संमेलनशेतकऱ्यांचा आवाज गोकुळमध्ये उमटणार, समविचारीतून बाबासाहेब देवकरांच्या उमेदवारीला उत्पादकांची पसंती

जाहिरात

 

रग्गेडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळा

schedule17 Aug 26 person by visibility 254 categoryक्रीडा

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत रग्गेडियन जिमचा चौथा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापुरातील रामकृष्ण हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला  जिमच्या सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सभासदांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत  कलागुणांचे सादरीकरण केले. नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि रगडियनच्या वर्धापनदिनाचा आनंद यामुळे संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले होते.यावेळी कोरगावकर ट्रस्टचे राज कोरगावकर यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाला निवृत्त पोलीस अधीक्षक तानाजी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदिल फरास, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विराज पाटील, कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सुशांत चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अमोल कोरगावकर, आकाश कोरगावकर, पूनम कोरगावकर, ओम कोरगावकर, प्रशांत डांगरे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes