Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केएमटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी ! नगरविकासचा आदेश !!तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करा, राजेश क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीबदली टप्पा क्रमांक सहामधील शिक्षकांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा २१ ऑगस्टपासून कोल्हापुरात  बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजनसहाय्यक प्राध्यापक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत लवकरच प्रक्रिया-मंत्री चंद्रकांत पाटील न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नेत्ररोग तपासणी शिबिरकोल्हापुरात 19 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वीज परिषद, वीज दरवाढीच्या विरोधात ठरणार आंदोलनाची दिशाकॉमर्स कॉलेजमध्ये डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरीगोकुळ करणार आईस्क्रिम अन् चीज निर्मिती ! गडहिंग्लजला उभारणार म्हैस विक्री केंद्र !!शिक्षक संघ थोरात गटाची कोल्हापूर शहर कार्यकारिणीची घोषणा

जाहिरात

 

28 ऑक्टोबरपासून कोल्हापूर -मुंबई नियमित विमानसेवा ! सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे दोन महिन्यात मुंबईपर्यंत धावेल

schedule09 Aug 25 person by visibility 2160 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई अशी नियमित विमानसेवा 28 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होत आहे . शिवाय येत्या डिसेंबर महिन्यापासून कोल्हापूर शहरातून देशभरातील 18 शहरासोबत विमान सेवेची कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
 खासदार महाडिक म्हणाले कोल्हापुरात फ्लाईंग क्लबची सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी दोन ते तीन कंपन्या उत्सुक आहेत.फ्लाईंग क्लबमुळे कोल्हापुरात वैमानिक तयार करण्यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचा फायदा कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील तरुण-तरुणींना होईल. कोल्हापुरातून देशभरातील मोठ्या शहरांना विमानसेवा सुरू व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.कोल्हापूर  ते दिल्ली विमानसेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे .सातही दिवस ही विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच कोल्हापूर ते मुंबई  नियमित विमानसेवा सुरू व्हावी या प्रयत्नाला यश आले आहे. 28 ऑक्टोबर 2025 पासून कोल्हापूर -मुंबई नियमित विमानसेवा सुरू होईल. सकाळी साडेसात वाजता कोल्हापुरातून विमान उड्डाण करेल. तर संध्याकाळी साडेसातच्या अगोदर ते मुंबई येथून कोल्हापूरला पोहोचेल.  कोल्हापूरच्या विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भविष्यकाळात कोल्हापूरचे विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनविण्यासाठी नियोजन सुरू आहे यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी कोल्हापूर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ कसे बनवता येईल यासंबंधी सर्वे करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिले आहेत. येत्या पाच ते सहा महिन्यात हा सर्वे पूर्ण होईल.  सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे सेवा सध्या कोल्हापूर ते पुण्यापर्यंत सुरू आहे. मुंबई येथील रेल्वे स्टेशनचे दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे आणखी दोन महिने ही रेल्वे सेवा पुण्यापर्यंतच धावेल. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून सह्याद्री एक्सप्रेस मुंबई पर्यंत धावेल असेही महाडिक म्हणाले
 जगभरात विमान प्रवाशांची संख्या वाढत आहे. कोल्हापूरही याला अपवाद नाही. आगामी तीन वर्षात 1800 नवीन विमाने भारतात येणार आहेत. यावरून विमानसेवेचे वाढते महत्व लक्षात येत आहे कोल्हापुरातील उद्योजकांनी हे चार विमानांची खरेदीसाठी नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र  ते नेमकी किती विमाने खरेदी करणारा है अधिकृतपणे आपणाला माहीत नाही असे महाडिक म्हणाले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes