Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण थथविवेकानंद कॉलेज हे गुणवत्तेचे मानदंड - प्राचार्य अभयकुमार साळुंखे सुप्रीमच्या आदेशाचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना संधी मिळणारअंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचाबार असोसिएशनमध्ये गटतट न आणता खंडपीठाचा लढा यशस्वी करू – नूतन पदाधिकारी-कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्दस्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचा आदेशटॉप वीस शिक्षकांमध्ये पदवीधर शिक्षिका अर्चना सुतार, कविता सरदेसाई !कुशिरेच्या ज्योती चव्हाणचे बारावी परीक्षेत लख्खं यशबारावी परीक्षेत विवेकानंद कॉलेजच्या गुणवत्तेची परंपरा कायमगोखले कॉलेजचा बारावीत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के

जाहिरात

 

आरपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ, सहा संघ सहभागी

schedule19 Apr 25 person by visibility 149 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रोटरी क्लब  ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित रोटरी प्रीमियर लीग - आरपीएल २०२५  स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. रणजी खेळाडू उमेश गोटखिंडीकर आणि संग्राम अतीतकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.  मेरी वेदर मैदानावर दिवस रात्र होणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले आहेत. 

उद्घाटन प्रसंगी रोटरीचे माजी प्रांतपाल उद्योजक संग्राम पाटील तसेच टी.आर.पाटील, व्यंकटेश बडे, संजय कदम, सचिन परांजपे, निलेश पाटील, डॉ. विलास नाईक, डॉ. संदीप पाटील, अभिजित पाटील, क्लबचे अध्यक्ष संजय भगत, इव्हेंट चेअरमन रवी मायदेव,  सेक्रेटरी रवी खोत, इव्हेंट को - चेअरमन डॉ.महादेव नरके, रविराज शिंदे, सचिन गाडगीळ,  अभिजीत भोसले ,दाजीबा पाटील , संदीप साळोखे उपस्थित होते. 

यावर्षी या स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले असून यामध्ये एमडब्ल्यूजी सुपर किंग्स , माई हुंडाई सिद्धिविनायक , कोहिनूर कीर्ती चॅलेंजर्स ,  बडेज लकी लेजंडस , लॉंग लाईफ मोती महल आणि हॉटेल किनारा स्पोर्ट्स या संघांचा समावेश आहे. या संघाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, बेळगाव, हुबळी, रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील ७८ खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. पहिल्या सामन्यात  हॉटेल किनारा स्पोर्ट्सने कोहिनूर कीर्ती संघावर आठ धावांची विजय मिळवला. सामनावीर सचिन हेगडे ठरला.  एम डब्ल्यू जी सुपर किंग्ज संघाने  माई हुंडाई सिद्धिविनायक संघावर चार गाडी राखून विजय मिळविला. विशाल कल्याणकर सामनावीर ठरला. लॉंग लाईफ मोती महल संघाने  कोहिनूर कीर्ती चॅलेंजर संघावर   २३ धावांची विजय मिळवला. सचिन गाडगीळ हे सामनावीर ठरला.   एमडब्ल्यूजी सुपर किंग्स संघाने बडेज लकी लेजंडस संघावर विजय मिळवला. नामदेव गुरव सामनावीर ठरला. रविवारी , २० एप्रिल  रोजी या स्पर्धेतील दोन उपांत्य आणि  अंतिम सामना आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes