महिनाभरानंतर प्रशांत कोरटकरला अटक
schedule24 Mar 25 person by visibility 269 categoryशैक्षणिकगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नागपूर येथील प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करुन अर्वाच्च शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी कोरटकरने दिली होती. कोरटकरच्या विरोधात कोल्हापुरात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. गेले महिनाभर कोरटकर हा फरार होता. कोल्हापूर पोलिस कोरटकरच्या मागावर होते. नागपूर, चंदगडपर्यंत तपास केला होता. कोरटकर हा तेलंगणमध्ये सापडला असल्याचे वृत्त आहे.