Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरातील कवी - लेखक - प्राध्यापक – शिक्षक एकवटले, शनिवारी करणार धरणे आंदोलन ! जंतरमंतरवरील तरुणांचे वाढविणार मनोबल!शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशाकांत कोल्हापूर देशात द्वितीय स्थानावरभारतीय मजदूर संघाचा ७२ वा वर्धापनदिन  साजरा,शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी - डॉ. संपत खिलारी महिला नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीशील शेतकरी बनतील - शौमिका महाडिक४१० दूध संस्थेविषयी शौमिका महाडिकांचे प्रेम हे पुतना मावशीचे, सभासदांचे पत्रकविद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात वंचित - डाव्या आघाडीची रॅलीकोल्हापुरात आंदोलनांचे जंतर-मंतर ! भाजप - काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर, प्रचंड घोषणाबाजी ! !गडहिंग्लजमधील आरटीई २५ टक्के प्रवेशातील  अनियमिततेची चौकशी; त्रिसदस्यीय समिती नियुक्तखोट्याला संरक्षण द्यायच्या नावाखाली नेत्यांनी खऱ्यांवर अन्याय करू नये : सुधीर मसवेकर

जाहिरात

 

गुणीदास फाऊंडेशनतर्फे शनिवारी तीर्थ विठ्ठल कार्यक्रम

schedule23 Jul 26 person by visibility 54 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील गुणीदास फाऊंडेशनतर्फे आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी, २५ जुलै २०२६ रोजी ‘तीर्थ विठ्ठल’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर येथे सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होईल. उद्योजक बापूसाहेब जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम होत आहे. गायक जयदीप वैद्य, गायिका अंजली मराठे हे अभंग, भक्तीगीते सादर करतील.डॉ. सचिन जगताप, केदार गुळवणी, पार्थ भूमकर, स्वरुप दिवाण, हरी जोशी, आशय कुलकर्णी, राजप्रसाद धर्माधिकारी साथ संगीत देणार आहेत.स्नेहल दामले निवेदन करणार आहेत.हा कार्यक्रम विनामूल्य आहे. प्रवेशिका २१ तारखेपासून संध्याकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत देवल क्लब येथे उपलब्ध होतील. नागरिकांनी, कार्यक्रमास येताना वारकरी वेशभूषेत यावे असे अध्यक्ष सुस्मिता सप्रे, राजप्रसाद धर्माधिकारी, सचिव डॉ. अजित शुक्ल यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes