वालावलकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी संगीतमय कवायतींचे सादरीकण
schedule16 Aug 26 person by visibility 39 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण मंडळाच्या शांतारामपंत वालावलकर हायस्कूमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या हस्ते ८o व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरभारती शिक्षण संस्थेचे माजी सचिव एम .एस. पाटोळे होते. राष्ट्रीय छात्र सेनेचा लिडर जय कुंभार याने मानवंदना देऊन पाहुण्यांना ध्वजारोहणासाठी आमंत्रित केले . धजारोहणानंतर गीतमंचच्या विद्यार्थीनी, पर्यवेक्षिका सरिता शिंदे आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांनी समूहस्वरात राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे गायन केले. मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी प्रास्ताविक केले. क्रीडाशिक्षक समीर जमादार यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला . शैक्षणिक वर्ष २००३ च्या बॅचमधील निलेश मनाडे आणि अन्य सहकाऱ्यांचा मुख्याध्यापकांनी यथोचित सत्कार केला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला कृतज्ञता भेट म्हणून प्रोजेक्टर मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केला. जिमखाना प्रमुख बनसोडे, जमादार व सागर वाडकर या शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली संगीतमय कवायतींचे सादरीकरण केले. शीतल कपिलेश्वरी यांनी सूत्रसंचालन केले. रोहिणी येडगे यांनी आभार मानले. यावेळी वाय. पी. पोवार विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती शिणगारे, स्वाती चव्हाण, वृषाली कुलकर्णी,मुक्त सैनिक हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष अशोक भिऊंगडे उपस्थित होते .